Posts

Showing posts from 2018

संगीत आणि अपघात

Image
संगीत आणि अपघात      संगीत आणि अपघात म्हणल्यावर कदाचित जरा दचकायला झाले असेल. हा विषय थोडा वेगळा आहे खरा. पण पूर्वी खरंच संगीतातही अनेक अपघात झालेले आहेत आणि कदाचित अजूनही होतही असतील. तेंव्हा या विषयाकडे लक्ष वेधले जावे व भविष्यात कोणाचे नुकसान होऊ नये, एवढाच या लेखाचा उद्देश. अपघात म्हणजे तंबोरा फ़ुटला किंवा तबला फ़ाटला, गायक-वादक कलाकार धडपडले असे नाही. या अपघातांचे स्वरुप असे आहे, कि हे झालेले अपघात, अपघात आहेत याचा कोणाला पत्ताच नाही. त्यामुळे झालेल्या अपघातांची ना दाद ना फ़िर्याद. अनेकांच्या आयुष्याचे कायमचे नुकसान होउनही कोणाला त्याचे सोयरसुतक नाही ही खेदाची बाब आहे..       हे अपघात म्हणजे काय तर, एखाद्या कलाकाराची कारकीर्द ऐन बहरात आली असताना, कधी एखाद्या गायकाचा आवाज खराब होतो, तर कधी वादकाचा हात खराब होतो, म्हणजे कालांतराने त्याला वाजवताच येइनासे होते.  असे कधी कधी आपण घडताना पाहिले अगर ऐकले आहे. विशेषतः संगीत क्षेत्रात वावरणाऱ्यांना अशा घटनांची कल्पना आहे. अशा अपघातांबद्दल ही चर्चा आहे. इतकेच काय, काही ना काही कारणाने आलेले ...

अद्वितीय पखवाजवादक : पं. अर्जुन शेजवळ

Image
अद्वितीय पखवाजवादक - पं . अर्जुन शेजवळ    १९८२ च्या सुमारास आमच्या उमेदवारीच्या काळात तबला शिकायला मुंबईला शिकायला जात असू. त्यावेळी केवळ संगीत शिकण्यासाठी आम्ही मुंबईला जातो याचं अनेकांना अप्रूप वाटत असावं. कारण मुंबईला गेल्यावर रहाण्यासाठी मिळालेल्या अनेक घरांमध्ये हे घर तुझे आहे, केंव्हाही रात्री-अपरात्री घरी ये, असा प्रेमाश्रय अनेक घरांतून मला मिळाला. इतक्या लांबून येऊन कोणीतरी संगीत क्षेत्रात काही धडपड करतो आहे, याचं त्याकाळी अप्रूप व कौतुक होतं. आसऱ्यासाठी लाभलेल्या घरांमधील एक म्हणजे पं अर्जुन शेजवळ यांचं घर होतं. खरं तर त्यांचा आणि माझा तसा काहीच सबंध नव्हता. मी काही पखवाज वाजवत  नव्हतो आणि त्यांच्याकडे शिकतही नव्हतो. त्यांचा मुलगा प्रकाश याचा मी मित्र एवढाच काय तो परिचय. पण त्या घराने मला सहज सामावून घेतले. त्यांच्या घरात मला कधीच परक्यासारखं वाटलं नाही. जसा त्यांचा मुलगा प्रकाश तसाच मी, असेच मला व त्यांनाही वाटे. अण्णा म्हणजे पं अर्जुन शेजवळ, नानी म्हणजे त्यांच्या पत्नी, मोठा मुलगा नितीन, प्रकाश व भावना असं हे कुटुंब. मस्जिद बंदर स्टेशनच्या रेल्व...

रियाजाची मात्रा

Image
रियाजाची मात्रा !!!    रियाजाचे खूपच महत्व आहे. रियाज़ फ़ार महत्वाचा आहे. रियाजा शिवाय संगीत अशक्य आहे, हे आणि असे उपदेश कम डोस कम ढोस देणारी विधाने संगीत शिकायला लागलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुरुंकडून किंवा एखाद्या बजुर्गाकडून नेहमीच ऐकायला लागतात. रियाज केल्याने एखादी गोष्ट किंवा ज्या गोष्टीचा सराव करु ती झळाळून निघते असे म्हणतात. त्यातून प्रकाश, तेज दिसायला लागते वगैरे वगैरे.. खरंच रियाजाने असे होते का?  रियाज एवढा महत्वाचा आहे का?   रियाज म्हणजे अभ्यास, सराव, प्रॅक्टीस, मेहनत, सातत्य, खर्डेघाशी, किंवा एकच गोष्ट खूप वेळ करणे. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्या गोष्टीवर आपण हळूहळू प्रभुत्व मिळवु शकतो एवढे तर सर्वांनाच माहिती आहे. तीच गोष्ट वारंवार केली कि ती आपण अधिक चांगल्या प्रकारे करु शकतो याही विषयी कोणाचे दुमत नाही. एखादे कोणी चित्र काढलेले असू दे, एखादे गणित सोडवणे असू दे, क्रिकेटच्या एखाद्या शॉटची पुनरावृती असू दे, गाण्यातली तान असू दे किंवा अंगमेहनत किंवा कोणतीही गोष्ट पुन्हा पुन्हा केली तर आपल्याला छान जमायला लागते. अगदी एखादे रा...

संगीतातील घराणी

Image
संगीतातील घराणी     संगीतात घराणी असावी कि असू नये याविषयावर नेहमीच उलटसुलट चर्चा चालू असते. बरेच वेळा मोठमोठे कलाकारही घराण्यांची बंधने हवीत कशाला असे म्हणताना दिसतात तेंव्हा सामान्यांना अधिकच गोंधळल्यासारखे होते. खरंच घराणी हवीत का नकोत? घराणं याचा शब्दश: अर्थ म्हणजे घर जरी असला तर घर असे सरळ का संबोधत नाहीत? कारण घर म्हणजे आपण राहतो ते चार भिंतींचे घर आणि घराणे म्हणजे नुसत्या चार भिंतीच नाहीत तर पूर्वजांच्या, वाडवडिलांच्या रुढी, परंपरा, चालिरीती, रितीरिवाज यांचे अनेक वर्षांचे संस्कार घेउन बनलेले घर म्हणजे घराणे. संगीतातील घराण्याच्या बाबतीतही असेच म्हणता येइल. संगीतातील घराणेसुद्धा आपल्या गुरुजनांच्या संस्कारांनी बनलेले असते. तो शिक्षण घेण्याचा एक राजमार्गच आहे म्हणा ना. आजही लग्नाच्या बाजारात चांगला मुलगा शोधायचा असेल तर त्याचं घराणं कोणतं किंवा कसे आहे हाच निकष मानला जातो. म्हणूनच चांगल्या घराण्यात संगीताचे शिक्षण घेतलेल्या कलाकाराचे गायन, वादन समजले नाही तरीही आनंद देणारेच असते. तो एक रुळलेला, खात्रीशीर, अनुभवसिद्ध यशाचा मार्ग असतो. या मार्गात धोक्याची ठिक...

महान गुरू पं. अरविंद मुळगांवकर

Image
महान गुरू पं. अरविंद मुळगांवकर..       पं. अरविंद मुळगांवकर यांच्यासारख्या महान गुरूंकडे मला थोडेफार शिकायला मिळाले याबद्दल मी स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजतो. आमची एकूणच पिढी या महान गुरुची ऋणी आहे. गुरुजींचे 'तबला' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि या पुस्तकाने तबलावादकांची तबला या वाद्याकडे पाहायची नजरच बदलून टाकली असे म्हणल्यास अतिशयोक्ती होणार नाही. वर्षानुवर्षे फक्त गुरुमुखी असलेली तबल्याची घरंदाज विद्या, जी साधारण तबलावादकांना ठाऊकही नव्हती किंवा त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलीच नसती, ती महान घरंदाज विद्या सामान्य तबलावादकांपर्यंत पोहोचवण्याचे अद्भुत कार्य गुरुजींनी केले. तोही एका अर्थी त्यांचे गुरू व फरुखाबाद घराण्याचे खलीफा उ. अमीर हुसेन खाँ यांच्या संस्कारांचाच एक भाग होता असे म्हणल्यास त्यात काहीच वावगे होणार नाही. खाँ साहेबांनी स्वत: मुक्त हस्ताने शिष्यांना विद्यादान केले. नवनवीन रचना बांधायला प्रोत्साहित केले. त्यामुळे गुरुजींनी तबला हे पुस्तक प्रसिद्ध करून पारंपरिक विद्येची दारे सर्वांसाठी खुली केली यात नवल काहीच नाही. त्याकाळी मोठ्या गुरुकडे पोहोचणेच अगोदर दु...

कलाकार आणि प्रवास

Image
कलाकार आणि प्रवास          कलाकार आणि प्रवास या चे अगदी घट्ट नाते आहे. कलाकार म्हणले कि प्रवास हा आलाच. कलाकाराच्या हातात तानपुरा आणि पायाला भिंगरी हे त्याच्या लल्लाटी जन्मत:च कोरलेले आहे म्हणा ना. मायबाप रसिक जिकडे आणि जेंव्हा बोलावतील तेंव्हा त्याला जायलाच हवे, तेही न कुरकुरता. मनासारखी बिदागी मिळालेली असो वा नसो, मनाजोगता व सुखकर प्रवास असो वा नसो, बोलावले कि जायचे आणि प्रवासातील कोणत्याही नकारात्मक गोष्टींची पार्श्वभूमी, आढी मनात न बाळगता समरसून आपली कला सादर करायची व त्याही पुढे रसिकांची मने जिंकायची ही तर मोठीच कसोटी. तानपुर्‍याची तार बाहेर रसिकांना कितीही गोड ऐकू आली तरी या सगळ्या गोष्टी विचारात घेता कलाकारांसाठी प्रवास हा जणू तारेवरचीच कसरत म्हणाना !! आता प्रवास पूर्वीइतका कठीण राहिलेला नाही. पूर्वी म्हणजे एस.टी., टांगा अशा डुचमळणार्‍या वाहानांमधून आपली वाद्ये सांभाळत प्रवासाच्या ठिकाणी पोहोचायचे. त्यातही दळणवळणाची साधने आजच्याइतकी सोपी व सुकर नव्हती. न ऐकू येणारे फ़ोन. तातडीने निरोप देण्यासाठी बुक केल्यावर कितीही वेळाने लागणारे ट्रं...

ग्रीनरूम

Image
ग्रीनरूम संगीताच्या कार्यक्रमाची ग्रीनरूम ही एक अद्भुत आणि कुतुहलाची गोष्ट आहे. मुख्य कलाकार कार्यक्रमस्थळी येउन प्रथम ग्रीनरूममध्ये येउन स्थानापन्न होतात तेंव्हा सामान्य रसिकांचे कुतुहल आपोआप जागृत होते. मंचावरती सर्वांना दिसणारे कलाकार प्रत्यक्षात कसे दिसतात, कसे बोलतात, काय बोलतात, कसे वागतात या सगळ्याचेच सामान्य रसिकांना मोठे आकर्षण असते. कलाकार ग्रीनरूममध्ये येताना एक वेगळीच व मजेशीर लगबग सुरु होते. बहुतेक वेळा मुख्य कलाकाराबरोबर त्यांची एक-दोन शिष्यमंडळी व एखादी खाशी किंवा जवळची व्यक्ती बरोबर असते. अशा मंडळीमध्ये कोणी डॉक्टर, वकील किंवा कोणी कलाकाराच्या जवळच्यांचे अगदी जवळचे असते, असे पाहुणे असतातच, तर कधी गावातील रसिक पुढारी, कलेक्टरांसारखे सरकारी अधिकारी, ही सगळी प्रतिष्ठित मंडळी ग्रीनरूममध्ये असतात. मुख्य कलाकारांशी किरकोळ गप्पाटपा करतात आणि आपल्या बसण्याची व्यवस्था झाली कि फ़ार वेळ तेथे न रेंगाळता स्थानापन्न होतात. बराच वेळ बाहेर रेंगाळणारे, ग्रीनरूमध्ये आत जाण्यासाठी ताटकळणारे चाहते, एव्हाना अस्वस्थ झालेले असतात. कलाकाराची एक झलक दिसण्यासाठी कोणी तहानलेला असतो, कोणी...

अद्वितीय तबलावादक :- पं. लालजी गोखले

Image
अद्वितीय तबलावादक पं. लालजी गोखले **********************************  सुप्रसिद्ध तबलावादक पं. लालजी गोखले यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या निमित्त दि. २७ जानेवारी ला शामराव कलमाडी प्रशाळेत विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांचे शिष्योत्तम श्री दत्ता भावे यांचे तबलावादन, श्रीमती सोनाली चक्रवर्ती यांचे कथक नृत्य व पं केदार बोडस यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते व पं लालजी गोखले यांचे पुतणे श्री विक्रम गोखले यांची विशेष उपस्तिथी या कार्यक्रमासाठी असणार आहे. मागील पिढीतील संगीत प्रेमींना पं लालजी यांची योग्यता व त्यांचे सांगीतिक योगदान या विषयी नव्याने सांगण्याची गरज नाही पण आत्ताच्या पिढीला त्यांची ओळख करून देणे व त्या निमित्ताने त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे असे वाटते. पं लालजींचा जन्म १६ जानेवारी १९१९ चा. त्याचे वडील रघुनाथराव व मातोश्री कमलाबाई दोघेही नाट्य-चित्रसृष्टीशी निगडीत. बाबुराव पेंटर निर्मित मुरलीवाला चित्रपटात त्यांनी कृष्णाची भूमिकाही केली. त्याकाळातील पहिले कृष्ण म्हणून त्यांचा राजकमल स्टुडीओत सत्कार करून व्ही शांताराम पुर...