उपजेचे बादशहा उ. झाकीर हुसेन
उपजेचे
बादशहा - उस्ताद झाकीर हुसेन
य़ेत्या ९ मार्च रोजी समस्त तबलावादकांचेच नव्हे तर
जगभरातील सर्व संगीत रसिकांचे लाडके सरताज उस्ताद झाकीरभाईंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने
मागे वळून पाहता असं लक्षात आलं कि, तबला ऐकायला लागुन आता चाळीसहून अधिक वर्ष लोटली
आहेत. यावर खरंतर विश्वास बसत नाही. ४० वर्षांनंतर आजही त्यांचे व्यक्तिमत्व आणि वादन
पूर्वी सारखेच तरुण आहे. चिरतारुण्याचा वर घेउन आलेले त्यांचे कर, काळाने कोणत्या अवस्थेत
बनवले आहेत याचे जणु संशोधनच व्हायला हवे ! १९७६ साली नूमविमध्ये बीजे मेडिकल आर्टस
सर्कलचा कार्यक्रम होता. पं.हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी संगतीसाठी झकीरभाईंना
प्रथमच ऐकत होतो. बहुतेक महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल अलीयावरजंग यांच्या मृत्युमुळे,
पक्के आठवत नाही, कार्यक्रम होइल कि नाही याविषयी साशंकताच होती. प्रथम हरिजींनी मारवा
व नंतर वाचस्पती वाजवला आणि त्यावेळी झाकीरभाइंनी तबल्यावर कमाल केली व रसिकांना जिंकले
एवढेच ध्यानात आहे. त्यानंतर झाकीरभाई हजारो वेळा पुण्यात आले पण प्रत्येक वेळा ते
आले, त्यांनी वाजवले आणि त्यांनी जिंकले. आज इतक्या वर्षांनंतर त्यांच्या संगतीने खुललेल्या
असंख्य मैफ़ली आणि त्यांच्या एकल वादनाने जिंकलेल्या अनेक मैफ़लींचा स्मरणपट डोळ्यासमोर
उभा रहातो. त्यातल्या प्रत्येक कार्यक्रमाविषयी किती लिहु आणि किती नको असेच व्हायला
होते.
त्यांच्याविषयी, त्यांची
वैयक्तिक जडणघडण किंवा त्यांचे चरित्र वगैरे लिहायचे झाले तर किंवा खरं सांगायचे झाले
तर, लिहायलाच काही नाही. एखाद्या महान व्यक्तिचा जीवनपट लिहिताना त्यांनी अमुक केले,
ते इकडे गेले, असे झाले, तसे झाले अशा अनेक घटना, जडणघडणीचा काळ वगैरे वगैरे खूप तपशील
सापडतो. उ. झाकीरभाईंच्या बाबतीत त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर ते तबला वाजवत राहिले,
या दोनच वाक्यात त्यांचे चरित्र संपते ! त्यांच्या नकळत्या वयापासुन ते फ़क्त तबला आणि
तबलाच वाजवताहेत ! त्यांचा जन्मच एका महान तबलावादकाच्या घरी झाला. वडील उ. अल्लारखा
खाँसाहेबांची पंजाब घराण्याची पक्की तालीम कधी आणि केंव्हा मिळाली, याही बाबतीत काही
सुरस, रंगतदार कहाणी नक्कीच नसणार. कारण लहानपणापासून केले काय तर फ़क्त तबला आणि तबला
! त्यातही त्यांचे बालपण पं.रविशंकर आणि उ. अली अकबरखाँ अशा अद्वितीय कलाकारांच्या
मांडीवर गेले. उ. अल्लारखा खाँसाहेबांची तालीम, पं.रविशंकर आणि उ. अली अकबरखाँचे सान्निध्य
व लहानपणीच अनुभवायला मिळालेला जगप्रवास तोही सांगितिक, अशा फ़क्त बिनभींतीच्या शाळेत
शिकल्यावर, झाकीरभाईंच्या प्रतिभेला कुंपण कोण घालणार. उ. अल्लारखा खाँसाहेब, पं.रविशंकर
आणि उ. अली अकबरखाँ या कालातीत त्रयीकडून पैलू पडल्यावर जे अजब रसायन तयार झाले त्याचेच
नाव उ. झाकीर हुसेन.
एका ठराविक उंचीचा कलाकार
किंवा परफ़ॉर्मर तयार होण्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असते. त्या परिश्रमांना
योग्य दिशाही मिळावी लागते. या दोनही गोष्टी झाकीरभाईंच्या बाबतीत किशोरावस्थेतच घडुन
गेल्या, त्यामुळे ऐन तारुण्यातच ते यशाच्या शिखरावर होते.योग्य शिक्षण, सुयोग्य मेहनत
व परिश्रम असे एकेक टप्पे ओलांडले कि त्यापुढे एक कलाकार म्हणून त्याची स्वतंत्र वाटचाल
सुरु होते. झाकीरभाईंनी हे टप्पे केंव्हाच ओलांडले व अल्पावधीतच एक महान कलाकार, संगतकार
अशी ओळख सार्या संगीतविश्वात निर्माण केली. त्यांच्या दैवजात कुशाग्र बुद्धीने, त्यांनी
ज्या ज्या कलाकारांना साथ केली, त्या सर्व बुजुर्ग कलाकारांची त्यांनी नुसती वाहवाच
मिळवली नाही, तर कलाकारांच्या आणि रसिकांच्याही गळ्यातील ताईत बनले. त्यांचे वादन त्यामुळेच
त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेउन ठेवले. त्यांच्या वादनाविषयी तर किती आणि काय बोलु
असे होते. त्यांच्या अक्षरश: शेकडो संस्मरणीय मैफ़लींचा जणु काही एक चित्रपटच आज डोळ्यासमोर
उभा आहे. वर उल्लेखलेली त्यांची पहिलीच मैफ़ल ज्यावेळी ऐकली त्या काळी पान-तंबाखु यासारखे
व्यसन नसलेला, सुशिक्षित, तरुण आणि देखणा तबलजी हे झाकीरभाई हे एकटेच होते असे म्हणल्यास
फ़ारसे वावगे होणार नाही. त्याकाळी तबलजी म्हणजे धोतर, कोट, टोपी किंवा अगदीच तरुण म्हणजे लेंगा, झब्बा,
अशिक्षित, तोंडात पानाचा तोबरा अशी सर्वसाधारण ओळख होती. अगोदरच्या जमान्यातील ही सर्व
बुजुर्ग मंडळी आपापल्या कलेत निर्विवाद महानच होती. या पार्श्वभूमीवर मॉडर्न जमान्याचे
प्रतिनिधीत्व करणारे झाकीरभाई या सर्वांपेक्षा निराळे होते. नखरेल पद्धतीने, अतिशय
तयारीचे वादन, केसांची झुल्पे उडवीत संगीताचा आनंद सर्वसामांन्यांपर्यंत देणार्या
झाकीरभाईंनी मैफ़लीचे रूपच बदलून टाकले. फ़क्त सोनेरी अथवा क्रीम रंगाचा झब्ब्यामधुन
बाहेर येउन, नव्या फ़ॅशनचे रंगीबेरंगी झब्बे व त्यांच्या वाजवतानाच्या वैशिष्ट्यपूर्ण
लकबी, जगभरातील सर्वच तबलजींनी अनुसरायला सुरवात केली. तबल्याची अधिक आसदार, नादमधुर
पुडी किंवा मंचावर चकाकणारा डग्गा त्यांच्या मैफ़लीत प्रथमच प्रकर्षाने दिसायला लागली.
उत्तम वादनाबरोबरच अशा अनेक बाह्य गोष्टींकडेही डोळसपणे पहायला झाकीरभाईंनीच शिकवले
असे म्हणल्यास मुळीच वावगे होणार नाही. फ़ाटक्या तुटक्या कापडी बॅगेतून कसरत करत तबल्याची
जोडी नेणार्या दीनवाण्या तबलजींचा इन्फ़िरिअरीटी कॉम्प्लेक्स घालवायला आणि तबलावादक
अशी ओळख अभिमानाने मिरवायला, झाकीरभाई हे एकमेव कारण होते. १९७५-७६ साली त्यांनी संगतकार
म्हणून पुण्यात प्रथमच पाउल ठेवले आणि त्यानंतर ते दरवर्षी येतच राहिले. तबलजी बिझी
असु शकतो हे झाकीरभाईंमुळेच सर्व जगाला कळले. काही महिने अमेरिकेत व काही भारतात असे
ते काम अजुनही करतात. पण इथे येताना प्रत्येक वर्षी झाकीरभाई काही तरी नवीन कल्पना
घेउन येत. ख्यालाचा विलंबित एकतालाचा ठेका, आकर्षक पद्धतीने व नवनवीन अक्षरांनी भरुन
वाजवायला त्यांनीच प्रथम सुरवात केली. पुढच्या
वर्षी ते आले, त्यावेळी त्यांनी डग्ग्यामधून गाण्याचे स्वर काढायला सुरवात केली. गायक-वादकाने
रिषभाचा स्वर लावताच, तबल्याच्या खुल्या नादातुन रिषभाचा प्रतिसाद देउन, तबलजीलाही
स्वर कळतो, हे त्यांच्यामुळेच सर्वांना समजायला लागले. हे काय नवीनच, असे तबलजी, गायक
वादक असे म्हणेम्हणेपर्यंत ते रसिकांचे लाडले झाले होते. एका वर्षी ते आले, त्यावेळी
तंतुवाद्याची साथ करताना, मध्ये वाजले जाणारे तुकडे वाजवताना, तो तुकडा बंदिशीच्या
आकाराचाच वाजवून, जिथे बंदिशीचा मुखडा सुरु होतो, तेथेच त्या बंदिशीचे मुख, वादकाबरोबरच
पकडायची अनोखी किमया त्यांनी सहजगत्या करुन दाखवली. जणू प्रत्येकवर्षी ते तबलावादकांची
पिढी अधिकाधिक साक्षर करत गेले. झाकीरभाईंना अनेक आकर्षक व मुश्किलातील मुश्किल तिहाया
घेउन लीलया समेवर आलेले ऐकताना कानाचे पारणे फ़िटत असे आणि आजही त्यांचे वादन तितकेच
तडफ़दार आहे याचेही आश्चर्य वाटते !
मुंबईला सेंट झेविअर्सच्या
प्रांगणात त्यांच्या संगतीने रंगलेली एक रात्र कधीच विसरणार नाही. त्या रात्री झाकीरभाई
नावाच्या एका झंझावाताने सर्वांनाच देहभान विसरायला लावले होते. रात्री ९-९:३० ला सुरु
झालेला कार्यक्रम सकाळी ६ वाजता संपला. त्या संगीत रजनीमध्ये पं.जसराज, उ.शाहीद परवेझ,
शोभा गुर्टु, पं.हरिप्रसाद चौरासिया व लालगुडी जयरामन यांची हिंदुस्थानी-कर्नाटक जुगलबंदी,
यांसारखे एकाहुन एक महान कलाकार होते आणि या सर्वांबरोबर रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत
एकमेकाद्वितीय संगतकार होते ते म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन ! सकाळी कार्यक्रम संपला
तेंव्हा सर्व उपस्थित श्रोत्यांची अवस्था शब्दातीत होती. त्यांच्या त्या दिवशीचे वादन
सर्व विशेषणे थिटी पडावीत असेच होते. फ़क्त रात्री २ च्या सुमारास घामाने भरलेला झब्बा
बदलण्यासाठी झाकीरभाई उठले तेवढेच. एकाच रात्री पाठोपाठ, त्यांच्या वादनातील गायनासाठीचे,
वादनासाठीचे, कर्नाटक मृदंगम बरोबरचे असे एकाहुन एक वैविध्यपूर्ण रंग ऐकुन, अशी मैफ़ल
ऐकायला मिळाली याबद्दल सर्व उपस्थितांनी खरेच परमेश्वराचे आभार मानले असतील. पं.रविशंकरांबरोबरची
प्रत्येक मैफ़लच आठवणींच्या कुपीत बंद केलेली आहे. दोघेही महान प्रतिभावान, दोघेही तालावर
तेवढेच प्रभुत्व असलेले त्यामुळे त्या दोघांची लयकारी ऐकणे म्हणजे आनंदाची परमावधी.
ठेका सुरु झाल्यावर सतारीच्या गतीमधुन राग प्रस्थापित झाला कि सहजपणे स्वरवाक्ये तालामध्ये
गुंफ़त, एकाहुन एक सरस तिहाया व त्याला, त्याच तोलामोलाची झाकीरभाईंनी, तबल्याच्या भाषेतून
दिलेली उत्तरे ऐकताना झालेल्या आनंदाची तुलना कशाशीही, करणे केवळ अशक्य आहे. पुण्याच्या
गरवारे कॉलेजमधील पं.वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर संगत केलेली मैफ़लही अशीच अविस्मरणीय
होती. ऐकायला पुलंपासुन संगीतातील अनेक थोर मंडळी उपस्थित होती. त्यावेळचे वसंतरावांचे
गाणे आणि झाकीरभाईंच्या तबल्याला पुणेकरांनी दिलेली अभूतपूर्व दाद अजून आठवते. टाळ्यांच्या
गजराने सर्व सभागृह उपस्थितांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. अजुन एका अविस्मरणीय
मैफ़लीचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही ते म्हणजे उ. अल्लारखा खाँ म्हणजे झाकीरभाईंचे
वडील व गुरु त्यांच्या उतार वयातील शेवटच्या काही मैफ़लींपैकी रंगभवन येथे उ. अल्लारखा
खाँ व झाकीरभाई यांची तबला सोलोची जुगलबंदी होती. खाँसाहेबांचा भिंगरीप्रमाणे पळणारा
हात पहिल्यासारखा चालत नव्हता. खूपच कमी वेगात त्यांचा हात चालत होता. तशा खूप कमी
वेगात श्रोत्यांवर प्रभाव पाडणे व श्रोत्यांना जिंकणे खूपच कठीण होते. पण झाकीरभाईंची
गुरुभक्ती व पितृप्रेम असे कमालीचे कि, उ. अल्लारखा खाँ ज्या लयीत वाजवत होते, त्या
संथ लयीच्या यत्किंचितही वरचढ न वाजवता आपल्या बुद्धीचातुर्याने कायद्या-रेल्यांची
बढत अशा खुमारीने केली कि उ. अल्लारखा खाँसाहेबांनी काय बहारदार वादन केले असेच श्रोत्यांना
वाटले ! पं. शिवकुमार शर्मांच्या बरोबर पण झाकीरभाईंचे रसायन चांगले जमते. शिवजींचेही
तालावर उत्तम प्रभुत्व आहे त्यामुळे त्यांच्याही अनेक सुंदर मैफ़ली अजुनही आठवतात. त्यांचा
हा सिलसिला अजुनही तितक्याच रंगतदारपणे अनुभवताना तेवढाच आनंद मिळतो. पं.हरिप्रसाद
चौरासिया, उ. अली अकबर खाँ, पं. निखिल बॅनर्जी, उ. विलायत खाँ यांसारखी तंतुवादकांचे
मांदियाळी असो किंवा पं. बिरजुमहाराजांसारखा महान नर्तक असो. जेवढा कलाकार गुणवत्तेने
मोठा तेवढाच जोश, उत्साह आणि त्यांचा अभ्यास अक्षरश: थक्क करतो. पं. बिरजु महाराजांच्या
एका मैफ़लीमध्ये तर दोघांनीही लयकारीची परमोच्च सीमा गाठली होती. टिळक स्मारक मंदीरामध्ये
रंगलेल्या त्या मैफ़लीमध्ये तालाच्या कोणत्याही म्हणजे अतिसूक्ष्म मात्रेवर एकमेक थांबत,
कोणत्या मात्रेवर थांबणार याचा अंदाज लागु न देता थांबताक्षणीच तेथुन तिहाई घेउन दोघेही
असे विलक्षण समेवर येत होते. त्यांचे असे सवाल जवाब म्हणजे दोघांच्याही पराकोटीच्या
साधनेची ती पावतीच होती.
संगीताचे बंदिश आणि उपज
असे श्वास-उ:श्वास आहेत. बंदिश म्हणजे जो बंदिस्त भाग आहे व ज्यावर रागाची इमारत उभी
रहाते तो आणि उपज म्हणजे आपल्या बुद्धीच्या कौशल्याने रागाची इमारत उस्फ़ूर्तपणे नटवणे
होय. उपजेला मर्यादा आहे ती फ़क्त आपल्या बुद्धीची ! अशा उपज अंगाचे, उस्ताद झाकीर हुसेन
हे अनभिषिक्त सम्राट आहेत. ९१ साली बंदिश या संस्थेने आयोजित केलेला, नूमविमधील पं.
रविशंकर यांच्याबरोबरचा कार्यक्रमही ऐकलेल्या मैफ़लींपैकी उत्तमातील एक होता. तो कार्यक्रम
संपल्यावर आम्हा कार्यकर्त्यांबरोबर फ़ोटो काढताना चाहत्यांच्या गराड्यातुन झाकीरभाईंना
पोहोचायला जरा उशीर झाला, तेंव्हा पं. रविशंकर चटकन झाकीरभाईंना उद्देशून म्हणाले कि
बंदिशमें ये उपजवाले कहाँसे आ गये !
मैफ़लीमध्ये संगत करताना,
विशेषत: वाद्यसंगीताची साथ करताना, मूळ वादकाने वाजवलेला बोल अगर तिहाई याचे संगतकार
तबल्यामधून उत्तर देतो असा रिवाज आहे. संगतकार जेवढा उत्तम तेवढा प्रत्युत्तर लवकर
दिले जाते. आश्चर्याची गोष्ट अशी कि झाकीरभाईंच्या बाबतीत ऐकणे आणि वाजवणे यात क्षणाचाही
विलंब होत नाही. त्यांची प्रतिभा आणि साधना अशी आहे कि कलाकाराने मूळ बोल वाजवताक्षणीच
त्याने काय वाजवले हे आणि काय प्रत्युत्तर द्यायचे, हे त्यांच्या मनात नुसते पक्के
झालेले नसते, तर काही कळायच्या आत हातातून निघूनही गेलेले असते ! हे इतके कमी वेळात
होते, कि रसिक दाद त्यांच्या प्रत्युत्तराला देउ, कि झाकीरभाईंच्या प्रतिभेला देउ,
या संभ्रमात पडतात. त्यांच्या हात आणि बुद्धी यामध्ये अंतरच नाही जणू असे वाटावे. विद्न्यानाच्या
भाषेत त्यांची एफ़िशिअन्सी मोजायची झाली तर ती १००%च भरेल. कानानी ऐकले कि त्याक्षणी,
मूळ वादकाबरोबर तिहायी वाजवायचे विस्मयकारक कसब, अशा अनोख्या अंदाजाने, फ़क्त झाकीरभाईच
करु जाणे. त्यांच्या वादनामुळे मुख्य कलाकाराला, आता या माणसापुढे मी काय वाजवु म्हणजे
मलाही वाहवा मिळेल असा प्रश्न पडावा. या त्यांच्या नवनवोन्मेषशाली प्रतिभेने रसिकांबरोबरच,
बहुतेक सर्व गायक-वादकही त्यांच्या चाहत्यांच्या यादीमध्ये अग्रभागी आहेत. त्यांनी
आपल्या दैवजात कुशाग्र बुद्धीने लाखो हजारो मैफ़लींचे सोने केले आहे. सर्व गायक वादकांची,
त्यासाठी दिलखुलास दाद त्यांनी असंख्य वेळा मिळवली आहे. इतकेच नव्हे तर छोट्यात छोटा
तबलावादक कुणाहीकडे शिकला, तरी त्याला वाजवायचे असते फ़क्त झाकीर हुसेन यांसारखेच किंवा
मोठा झाल्यावर तू कोण होणार असे विचारले तर एकच उत्तर येते ते म्हणजे उ. झाकीर हुसेन
! त्यांच्या वादनाचेच काय पण त्यांच्या फ़ॅशनचेसुद्धा अनेक होतकरु तबलावादक, आजच्या
भाषेत डाय हार्ड फ़ॅन आहेत.
अजातशत्रु, विद्येचे
पाणी खूप खोल व गहिरे असल्यामुळे अत्यंत लीन, कलेचा व बुजुर्ग कलावंतांचा मनोभावे आदर
राखणारा असा हा लोकोत्तर कलावंत कालजयी म्हणायला हवा. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा व त्यांचे ईश्वरी स्पर्श लाभलेले चिरतरुण वादन व व्यक्तिमत्व असेच आपणा सर्वांना
अनेक वर्षे अनुभवायला मिळो हीच देवाकडे प्रार्थना.
हेमकांत नावडीकर
navdikar@gmail.com


ग्रेट!!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteमनःपूर्वक धन्यवाद !!!
Deleteअति महान कलावंतावर अति सुंदर लेख! धन्यवाद !
Deleteग्रेट!!
ReplyDeleteअतिशय छान लेख लिहिला आहे।
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!!
DeleteKhup aprateem ani mukhya mhanje zakir bhainbaddal shabdat vyakta karta yena Keval ashakkya astana pan tyanchyabaddal agadi yogya shabdat lihila ahe. Thank you hemkant ji.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!!
Deleteवाह !! अप्रतिम माहिती !!
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद
DeleteGreat.. thanks for Writing fabulous blog
ReplyDeleteअप्रतिम कलाकार व अप्रतीम लेख
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!!
Deleteअतिशय सुंदर लेख क्या बात है 👌👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!!
ReplyDeleteDHA TIRKIT TAK DHINNA $KDHAN
ReplyDeleteDHA TIRKIT TAK TINNA $KDHAN
DHA TIRKIT TAK DHINNA $KDHAN
ReplyDeleteDHA TIRKIT TAK TINNA $KDHAN
हेमकांत.. सध्यातरी संगीतावर इतक्या साक्षेपाने आणि अभ्यासाने लिहिणारा तू एकमेव आहेस.. अप्रतिम लेख.. एक आठवण मीही सांगतो.. २००१ साली गोव्याला कला अकॅडमी मध्ये लतादीदींना 'चतुरंग'चा जीवन गौरव पुरस्कार होता.. त्यावेळी जीवन गौरव पुरस्कारांचं एव्हडं पेव फुटलं न्हवत.. झाकीर भाईंचा तबला होता.. समोरच्या ओळीत सगळं मंगेशकर कुटुंब, प्रफुल्लाताई डहाणूकर आणि बरीच दिग्गज मंडळी.. त्यादिवशी झाकीरभाईंचा तबला वेगळा होता.. पूर्ण घरंदाज तबला.. निरनिराळ्या घराण्यांच्या गोष्टी त्यांनी सांगून वाजवल्या... रेल्वेचे, कुत्र्या मांजरांचे आवाज असल्या प्रकारांना त्या दिवशी पूर्ण मज्जाव होता.. दीड तास लखनौ, फराक्काबाद, दिल्ली, पूरब आणि अर्थात पंजाब अश्या सगळ्या घराण्यांच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.. वादन संपलं.. स्टेजवरून उडी मारून झाकीर भाईंनी थेट लतादीदींच्या पायावर साष्टांग नमस्कार घातला.. लतादीदींनी आपल्या बोटातली हिऱ्याची अंगठी त्यांच्या बोटात घातली त्या दिवशी.. भाग्य म्हणजे आणखीन काय असाव?? तू म्हणतोस त्या प्रमाणे तबला वादन तर झालंच पण कुठेही कसं वागावं हे त्यांच्या कडूनच शिकावं.. अर्थात लहानपणापासून मोठ्या लोकात सहज वावरायला मिळाल्यामुळे हेही स्वाभाविकच...
ReplyDeleteकौतुक खूपच जास्त झाले आहे.... सुंदर आठवण... व धन्यवाद...
Deleteअप्रतीम सर 🙏
ReplyDeleteवा छान लेख
ReplyDeleteअतिशय सुंदर लिखाण.��
ReplyDeleteहेमकांत,अतिशय अभ्यासपूर्ण लिखाणाचा नमुना म्हणजे हा लेख.खूप अभिमानास्पद लेखन.ऊ.झाकिरहुसैनयाना देखील अत्यंत आवडेल
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद...
DeleteKhup Chhan Lihilay
ReplyDeleteमनापासून धन्यवाद ....
Deleteअप्रतिम 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDeleteमनापासून धन्यवाद ....
Deleteकमाल!!
ReplyDeleteमनापासून धन्यवाद ....
DeleteVery nice 👌
ReplyDeleteThanks 🙏🏻🙏🏻🙏🏻
Deleteअप्रतिम लेख, यातल्या काही मैफिलीचा आस्वाद घेतला आहे.
ReplyDeleteसमृद्ध अनुभवाची आठवण उजळली. 🙏🏻
सगळ्यात आधी, उस्ताद झाकिर हुसेन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
ReplyDeleteअप्रतिम कळकाराबद्दल तुम्ही असे काही शब्द आणि विचार मांडलेत, की मी उपस्थित राहून ऐकलेले सर्व सवाई गंधर्व महोत्सवातील कार्यक्रम समोर दिसू लागले. सर्व श्रोत्यांनी भरलेला मंडप एकीकडे आणि मंचावरील मोजके कलाकार, बास्स एवढंच दृश्य, पण किती मंत्रमुग्ध कलाकारी आणि त्यांना मिळणारी प्रत्येक दाद...हा जणू एक सोहळाच असतो. त्यात ही, उस्ताद झाकिर हुसेन आहेत का, कोणाला साथसंगत करणार आहेत...असे श्रोते आहेत. त्यात, एकदा कार्यक्रम सुरू झाला की अगदी pindrop silence असतो आणि श्रवण क्रिया सुरू असते.
असा आभास असो की आपण देवांनाच बघतोय. असो.... आम्ही भाग्यवंत आहोत की आम्ही ह्या काळात जन्मलो आणि धन्य झालो.
उस्ताद झाकीर हुसेन जी, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
मराठी keyboard chi अक्षरे टाईप करताना झालेल्या typo errors बद्दल क्षमा असावी 🙏🙏🙏
Deleteधन्यवाद
Delete