संगीत आणि अपघात
संगीत आणि अपघात
संगीत आणि अपघात म्हणल्यावर कदाचित जरा दचकायला झाले असेल. हा विषय थोडा वेगळा आहे खरा. पण पूर्वी खरंच संगीतातही अनेक अपघात झालेले आहेत आणि कदाचित अजूनही होतही असतील. तेंव्हा या विषयाकडे लक्ष वेधले जावे व भविष्यात कोणाचे नुकसान होऊ नये, एवढाच या लेखाचा उद्देश. अपघात म्हणजे तंबोरा फ़ुटला किंवा तबला फ़ाटला, गायक-वादक कलाकार धडपडले असे नाही. या अपघातांचे स्वरुप असे आहे, कि हे झालेले अपघात, अपघात आहेत याचा कोणाला पत्ताच नाही. त्यामुळे झालेल्या अपघातांची ना दाद ना फ़िर्याद. अनेकांच्या आयुष्याचे कायमचे नुकसान होउनही कोणाला त्याचे सोयरसुतक नाही ही खेदाची बाब आहे..
हे अपघात म्हणजे काय तर, एखाद्या कलाकाराची कारकीर्द ऐन बहरात आली असताना, कधी एखाद्या गायकाचा आवाज खराब होतो, तर कधी वादकाचा हात खराब होतो, म्हणजे कालांतराने त्याला वाजवताच येइनासे होते. असे कधी कधी आपण घडताना पाहिले अगर ऐकले आहे. विशेषतः संगीत क्षेत्रात वावरणाऱ्यांना अशा घटनांची कल्पना आहे. अशा अपघातांबद्दल ही चर्चा आहे. इतकेच काय, काही ना काही कारणाने आलेले मानसिक वैफ़ल्य, हा ही कलावंताच्या आयुष्यातील एक अपघातच म्हणायला हवा. अशा मानसिक वैफ़ल्यावर वेळीच आणि योग्य मानसोपचार न झाल्याने काही कलाकारांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली आहेत. दुर्दैवाने अशा अपघातांचा फ़ारसा गांभीर्याने कोणी विचार केल्याचे आढळत नाही. मात्र यामुळे अनेक कलाकारांच्या आयुष्यात कायमस्वरुपी नुकसान झालेले आहे. संख्येने अशी उदाहरणे खूपच कमी असली, तरी त्या कलाकारांचे आयुष्यभराचे नुकसान झालेले आहे. असे अपघात घडल्यावर त्यातून आलेल्या विफलतेने, मुख्यत्वे अर्थार्जन थांबते आणि त्यामुळे उरते ती केवळ आयुष्याची वाताहात, परवड आणि वास्तवाचे चटके. अनेक वेळा आपण पहातो कि अमुक एक कलाकार किती सुरेख वाजवत असे, अमक्याचा गळा किती सुरेख फ़िरत होता, पण ऐन उमेदीच्या वयात किंवा ज्या वयात कारकीर्द बहरायची, त्या काळात हात चालेनासा होणे, गळा फ़िरेनासा होणे, आवाज वर न चढणे, अशा झालेल्या अपघातांची फ़िकीरच कोणी केली नाही. अगोदरच कलाकाराचे आयुष्य म्हणजे एक खडतर प्रवास. कलाकार त्यातून मुळातच सर्वार्थाने गरीब, त्यामुळे नशीबाला दोष देत, जसे जमेल तसे आयुष्य रेटत रहायचे, एवढेच त्याला माहिती. गोविंदराव टेंब्यांनी एके ठिकाणी म्हणले आहे, थोर कलावंताची दुर्दैवाशी झुंज जगापुढे पाल्हाळाने मांडू नये, उगाच जगाची बदनामी व्हायची ! कधी कधी कारकीर्द बहरात असताना, मानसिक किंवा शारिरीक, पण अचानक झालेल्या आघातामुळे, विमनस्क अवस्थेत रस्त्यातून फ़िरणारे कलाकर पाहुन, अतीव दु:ख होतं. अगोदरच कलाकार म्हणजे विक्षीप्त असा शिक्का बसलेले. त्यातून अशा अघातांमुळे अनेक गुणी कलाकार, केंव्हा केंव्हा आक्रमक होतात किंवा कसे वागतील याचा नेम नाही. हे सगळे अपघातच म्हणायला हवेत. अशा अचानक ओढवलेल्या अपघातांची वेळीच योग्य खबरदारी घेतली असती, तर कदाचित या कलाकारांची आयुष्ये नक्की पालटली असती.
काय असतील बरं या मागची कारणं, याचा शोध घ्यायचा कोणी प्रयत्न करायला हवा. मुळात तो अपघात जाणवला तरच त्यावर इलाज होणार. पण अशा अपघातांवर इलाज करणे खूपच अवघड. या अगोदरच्या पिढीत असे अपघात जेंव्हा होत होते, त्यावेळी अशा आजारांवरचा त्या पिढीतील कलाकारांनी, स्वत:च शोधून काढलेला एक साधा सोपा उपाय, म्हणजे रियाज ! मागची पिढी ही रियाजी, म्हणजे प्रचंड रियाज करणारी, रियाजावरच विश्वास असणारी होती. त्यामुळे, खूप रियाज करुन रियाजच मला तारेल किंवा मारेल, अशी धारणा असणारे कलाकार त्याकाळी होते. त्याकाळी असे अनेक कलाकार, अशा अपघातातून आश्चर्यकारकरित्या सही सलामत बाहेर पडलेले आहेत. केसरबाई केरकरांचेच उदाहरण आहे कि त्यांना गाता येइनासे झाल्यावरसुद्धा, त्यांनी प्रचंड रियाज केला आणि रियाजच यातून आपल्याला तारुन नेईल या विश्वासाने, आपला गळा पुन्हा गाता ठेवला. केवळ रियाजाने विपरित परिस्थितीवर, नैसर्गिक क्षमतेवरही मात करता येउ शकते, याचेच हे उदाहरण आहे. अहमदजान थिरकवा हे देखील नव्वदी ओलांडल्यावर, आधाराशिवाय चालू शकत नसत, पण मंचावर बसल्यावर अभूतपूर्व वादन करत असत. त्यामुळे शारिरीक कमतरतेवर, रियाजामुळे मात करता येउ शकते असे इतिहास सांगतो. पण मानसिक वैफ़ल्याचे काय.
संगीत ही गुरुमुखी विद्या आहे यात काहीच दुमत नाही. विद्येचे पुढच्या पिढीत हस्तांतरित करण्याचे काम ही गुरु मंडळी इमाने इतबारे करत आलेली आहेत. पण आवाजात निर्माण झालेल्या किंवा वादकांच्या हातात निर्माण झालेल्या दोषाची जबाबदारी नक्की कोणाची ? गुरुंची कि विद्यार्थ्याची, कि चुकीचा रियाज केलेल्या विद्यार्थ्याची, कि चुकीचा रियाज करु देणार्या गुरुंची ? भारतीय संस्कृतीत गुरुला साक्षात परब्रह्माचीच उपमा दिल्यावर गुरुंना अशा चुकांबद्दल कसे दोषी धरणार ?
अशा प्रश्नांची उत्तरे, आत्ता शोधायला सुरवात केली, तर पुढे होणारे अपघात टळतील आणि कलावंतांच्या पुढील पिढीतील जीवनातील हलाखी कमी होईल, सुसह्य होईल ही आशा. अलीकडच्या काळात अशा अपघातांची संख्या निश्चितपणे कमी होताना दिसते आहे. एकेकाळी अशा अपघातग्रस्त कलाकारांचे प्रमाण थोडे अधिक होते पण नवीन पिढी आता सुशिक्षित आणि सूज्ञ आहे. स्वतः निवडलेल्या संगीत व्यवसायाकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून व डोळसपणे पहात आहे. संगीतकला ही सर्वार्थाने प्रगल्भ होऊ लागली आहे ही याचीच पावती आहे.
हेमकांत नावडीकर...

वरील लेख संक्षिप्त रुपात दै.सकाळ मध्ये यापूर्वी प्रकाशित झाला आहे....
ReplyDeleteखूप महत्वाचा विचार मांडला आहे आपण..असे अपघात होण्या मागच्या कारणांचा नक्कीच सखोल विचार होणे आवश्यक आहे .
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद...
Deleteखूपच अप्रतीम लेख आणि अत्यंत गरजेचा आहे
Deleteअतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे या लेखात.सखोल विचार होणं खरंच आवश्यक आहे
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद...
Deleteखूप छान मांडणी केली आहे.
ReplyDeleteखूप छान मांडणी केली आहे.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद...
DeleteVery well written, unearthing the issue much needed to be focused. Can any music loving specialist doctor in professional hazards or physio therapist be come forward after reading this very fact stating article ??
ReplyDeleteThanks a lot..
DeleteThe above comment is written by me, Abhay Joshi.
ReplyDeleteA very thought provoking subject very well written.
ReplyDeleteThank you sir ji...
Deleteबरोबर आहे
ReplyDeleteधन्यवाद...
Delete������
ReplyDelete👌👍🙏
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteविशिष्ठ अवयवाचा विमा करता येतो. चित्रकाराच्या हाताचा विमा, वादकाच्या हाताचा विमा किंवा गायकाच्या आवाजाचा विमा।
ReplyDeleteपरंतू या विम्याची किंमत खूपच जास्त आहे, त्याचा हप्ता भरणे परवडत नाही। तसेच एजंटांना फारसे कमिशन देखिल मिळत नसल्याने त्याचा प्रसार फारसा झालेला नाही।
विनयजी सूचना चांगली आहे पण बहुतेक वेळा अशा अपघात किंवा आघांतामुळे कलावंत आपली हिंमतच हरवून बसतो हे खूप वाईट आहे.. मनःपूर्वक धन्यवाद
DeleteHa vishay kadhi pudhe ala nahi, fakt personal level var bolala gela,,, but really to think about.. Thank you
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🙏🏻
Deleteफारच छान.ऊत्तम विचार
ReplyDelete