Posts

Showing posts from 2019

नवरत्नहार

Image
नवरत्नहार        हल्ली गायक वादकांचे कार्यक्रम ठरवणे खूप सोपे झाले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण, ध्वनिसंयोजक, वृत्तपत्रातील जाहिरात, कलाकार, त्यांच्या तारखा ठरवणे इतक्या सगळया गोष्टी आता अजिबात अवघड राहिल्या नाहीत. फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि एकूणच मोबाइल क्रांतीमुळे तर सर्व हाताच्या बोटावर आले आहे. आजच्या पिढीला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण पूर्वी कलाकारांचे पत्ते मिळवणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे सगळेच अवघड होते. त्या काळी कलाकार, रसिक, संयोजक या तीनही वेगवेगळ्या संस्था होत्या. हे तीनही जण एकमेकांत ढवळाढवळ करत नसत. म्हणजे त्याची कोणाला आवश्यकताही वाटत नव्हती. संयोजकाने कलाकारांशी संवाद साधून कार्यक्रम ठरवायचा. कार्यक्रम कोठे करायचा, केंव्हा करायचा हे ही त्या संयोजकानेच ठरवायचे. कलाकाराने ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी येउन आपली कला सादर करायची आणि कार्यक्रम जाहीर झाल्यावर रसिकांनी उपस्थित राहून संगीताचा आस्वाद घ्यायचा. असे एखाद्या कार्यक्रमाचे साधे सरळ गणित होते. एवढेच नव्हे तर कलाकाराने थेट संयोजकांना कार्यक्रम आयोजित करायला सांगणे हे कला...

गझलांचे शहनशहा : उस्ताद मेहदी हसन

Image
१३ जून म्हणजे खाँसाहेबांना जाऊन आज ७ वर्षं झाली.... त्यांना भावपूर्णआदरांजली          गझलांचे शहनशहा : उस्ताद मेहदी हसन           १९७० च्या दशकात रेकॉर्ड प्लेयर म्हणजे ध्वनिमुद्रिकांचा जमाना होता. घरामध्ये रेकॉर्डप्लेयर असणे हे त्याकाळी श्रीमंतीचे लक्षण होते. त्यामुळे प्रत्येक सुसंस्कृत घरात सोनी, ग्रुन्डीग, अकाई, फिलिप्स असे प्लेयर असत. आणि अशा प्रत्येक घरात नाट्यसंगीत, शास्त्रीय, सुगमसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा संग्रह असे. त्यामध्ये बालगंधर्व, बडे गुलाम अली, हिराबाई बडोदेकर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, परवीन सुलताना, रविशंकर यांच्याबरोबर लता, आशा, हृदयनाथांची कोळीगीते पण असत. मात्र या संग्रहामध्ये, या एका गायकाची एक तरी ध्वनिमुद्रिका असल्याशिवाय हा संग्रह पूर्ण होत नसे. हा संग्रह पूर्ण होई, तो पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध गायक उस्ताद मेहदी हसनखां यांच्या  गझलांच्या ध्वनीमुद्रिकांनी. त्या काळात मेहदी हसन खाँसाहेबांनी, आपल्या दर्दभऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने आणि अर्थपूर्ण गझलांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेण्यास सुरुवात केली होत...

साधनेत रमणारा तबलावादक : पं. आनिंदो चटर्जी

Image
पंडित आनिंदो चटर्जी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २००३ साली सकाळ वृत्तपत्रासाठी घेतलेली मुलाखत.. आज ३० मे रोजी त्यांचा वाढदिवसानिमित्त पंडितजींचे हार्दिक अभिष्टचिंतन... साधनेत रमणारा तबलावादक : पं. आनिंदो चटर्जी                 प्रसिद्ध तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खान यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त विख्यात वादक पंडित आनिंदो चटर्जी यांच्या   तबला वादनाचा कार्यक्रम नुकताच पुण्यातील भरत नाट्य मंदीरात आयोजित करण्यात आला होता. पुण्यात बर्‍याच कालावधीनंतर व संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रथमच त्यांचा कार्यक्रम झाल्याने , रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. सुमारे दोन तास चाललेले अत्यंत दर्जेदार व प्रभावी वादन ऐकून ‘ श्रुती धन्य जाहल्या ’ अशीच सर्व श्रोत्यांची भावना होती.           श्रेष्ठ गुरूंकडून प्राप्त केलेली दर्जेदार व घराणेदार विद्या , व ती विद्या खऱ्या अर्थाने हस्तगत करण्यासाठी घेतलेली मेहनत , यामुळे वादनात आलेली कमालीची सहजता , बोलांचा सु...

अभिजात संगीताची प्रभा - डॉक्टर प्रभा अत्रे

Image
डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या सहस्रचंद्र दर्शनानिमित्त ९ सप्टेंबर  २०१२ साली  दै. सकाळ मध्ये पूर्व प्रकाशित झालेला लेख....  अभिजात संगीताची प्रभा           मैफलीचे सभाग्रह श्रोत्यांनी तुडुंब भरलेले असते. श्रोते मुख्य कलाकाराची आतुरतेने वाट पाहत असतात. निवेदकाने.... आणि स्वरमंचावर विराजमान होत आहेत डॉक्टर प्रभा अत्रे.... असे म्हणताच संपूर्ण   सभागृहात एक हुंकाराची लहर उमटते. जरीकाठाची शुभ्र किंवा मोतिया रंगाच्या   साडीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पेहरावातील त्यांचे   प्रसन्न व्यक्तिमत्व , मंचावर पाहताक्षणीच त्यांच्यातल्या   असामान्यत्वाची जाणीव करून देते. त्यांनी केलेल्या साधनेचे तेज , त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवते. वाद्यांचा स्वरमेळ नीट जुळता जुळता , एव्हाना सर्व सभामंडप प्रभाताईंच्या प्रभावळीमध्ये नकळत आकर्षिलेला असतो. प्रभाताई काय गाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचते. यमन , मारूबिहाग , जोगकौंस सारख्या भरभक्कम रागाने मैफलीला रंग भरण्यास सुरुवात होते. पहिल्याच समेला माना डोलायला लागतात , तर जाणकार श्रोते...

कुमार नावाची चिरतरुण मैफल

Image
२०१२ साली कुमारजींच्या जन्म दिनाचे निमित्ताने मटामध्ये प्रसिद्ध झालेला लेख.... कुमार नावाची चिरतरुण मैफल ...         पूर्वीच्या काळी म्हणजे किमान तीस चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत, नामांकित, बुजुर्ग गायकाची खासगी किंवा छोटेखानी मैफल फारशी दुर्मिळ गोष्ट नव्हती. मोठे कलाकार हे आज इतके मोठे झाले आहेत, की त्यांची सर्वसामान्य श्रोत्यांशी असलेली नाळ तुटल्यासारखीच अवस्था झाली आहे. मोठया, किंवा स्टार कलाकारांची खाजगी किंवा छोटेखानी मैफल ही आता विस्मृतीतच गेलेली गोष्ट झाली आहे खरी. आणि आजच्या कलाक्षेत्राचा एकूण व्यवहार पाहता, तो ही या    कालचक्राचा माहिमाच म्हणायचा. पूर्वी कलाकाराने आज मी तुम्हाला अमुक एक राग ऐकवतो, असे म्हटल्यावर, अरे, खरेच आपण हे ऐकूया किंवा ऐकायला पाहिजे, असे श्रोत्यांना मनापासून वाटे. खूप वेळ लांब ताना घेतल्यावर टाळ्या वाजवणे, एकच प्रकार बराच वेळ करणे, असे सवंग प्रकार, हे सवंग आहेत, हे पटणाऱ्या श्रोत्यांची संख्या जास्त होती. तबलजी व मुख्य कलाकार यांची आज एकमेकांवर कुरघोडी करण्याची, भर मैफलीमध्ये चाललेली धडपड पाहून, ही कला आहे की त्या...

पुणेकर रसिक श्रोते

Image
पुणेकर  रसिक  श्रोते .....           पुणेकर श्रो ता  तुम्हाला ओळखाय चा  असेल ,   तर तुम्हाला स्वत:ला उत्तम स्वरज्ञान हवे. म्हणजे  काय तर बोलाणाऱ्याचा   सूर ओळखता यायला हवा. याचा अर्थ समस्त पुणेकर मंडळी संगीतात बोलतात असे नाही, तर  त्यांच्या संभाषणाचा सूर ओळखता यायला हवा,  त्यांना काय म्हणायचे आहे, हे तुम्हाला कळायला हवे, नाही तर तुम्हाला कसे सहज खिशात टाकले, हे गावभर होणार किंवा तुम्हाला फ़ारसे काही समजत नाही ,   अशी किंवा तुमची कशी विकेट घेतली ,   याची ही पुणेकर मंडळी मजा घेणार. कल्पना करा एखाद्या कार्यक्रमाचे तिकिट तुम्ही काढायला गेला आहात आणि तुमच्या शेजारी एक पुणेकर गृहस्थ उभे आहेत. त्यावेळच्या  त्यांच्याशी झालेल्या  संवादावरून  मी काय म्हणतो याचा  थोडा अंदाज येईल. सहसा पुणेकर स्वत:हून दुस ऱ्या शी बोलायला जात नाहीत. पण सार्वजनिक ठिकाणी जिथे फ़ारसा धोका नसल्यास ,   कधी कधी स्वत:हून बोलतातही. धोका याचा अर्थ तिकिटांसाठी खूप गर्दी असणे, तिकिटे मिळायची शक्यता ख...

सूरात चिंब भिजलेले : अजय - अतुल

Image
सुमारे ११ वर्षांपूर्वी सकाळ समूहातर्फे स्वर-रंग हे प्रामुख्याने संगीताला वाहिलेले त्रैमासिक सुरु झाले होते. त्याच्या पहिल्या अंकासाठी अजय-अतुल यांची मुलाखत घेतली होती .... त्यानंतरच्या काळातही त्यांनी अत्यंत दर्जेदार व सुमधुर गाण्यांची परंपरा चालू ठेवली आहे, इतकेच नव्हे तर त्यांच्या यशाची, किर्तीची व गुणवतेचीही कमान चढतीच राहिली आहे ... सूरात चिंब भिजलेले : अजय- अतुल      अमिताभ बच्चन, राम गोपाल वर्मा, सचिन, राज ठाकरे, महेश मांजरेकर आणि दक्षिणेतील सर्व सुपरस्टार्स, यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे. या सर्वांकडे विश्वविनायक नावाचा संगीत रचनांचा अल्बम आहे. त्यातील एकदंताय वक्रतुण्डाय हा श्लोक अलीकडेच  त्याला लावलेल्या सुंदर चालीने व त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण  स्वरसाजाने, सामान्यांपासून संगीत जाणाणाऱ्यांपर्यंत सर्वांनीच प्रशंसलेला आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनाही  या अल्बमने असेच मोहित केले आहे इतकेच काय तर, त्यांच्या प्रत्येक गाडीत हा अल्बम वाजत असतो. यामध्ये  अभिमान वाटावी एक गोष्ट आहे, जी अनेकांना माहीत नाही, ती म्हणजे या विश्वविनायकचे रचनाकार अ...