करोनासूर : काही सूर, काही बेसूर...३
करोनासूर : काही सूर, काही बेसूर...३ हळूहळू करोनाला मंडळी घाबरेनाशी झाली. करोनानेच मरण यायचे तर उपाशी पोटी मारण्यापेक्षा काय होईल ते होऊ दे अशी मानसिकता सर्वांचीच होऊ लागली. करोनाचा बहर हळूहळू ओसरू लागला, असे वाटून घ्यायला हरकत नाही, अशी चिन्हे दिसू लागली. त्यावरील प्रतिबंधक लस दृष्टीपथात आली आहे असे वाटू लागले. डिजिटल मिडीया, डिजिटल मैफलींच्या आभासी जगाची रसिक प्रेक्षकांना सवय होते आहे असे कार्यक्रमाच्या संयोजकांना वाटू लागले आणि आभासी मैफली तिकीट लावून करण्यासाठी प्रयत्न होऊ लागले,जे कलाकारांसाठी खूप स्वागतार्ह होते. पण त्यालाही रसिकांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही असेच म्हणावे लागेल. आजही आभासी किंवा व्हर्चुअल कार्यक्रमांची रेलचेल दिसते. त्यातही विनामूल्य आणि प्रवेशमूल्यासहित असे दोनही पर्याय प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत. पण तिकीटवाल्याच काय पण विनामूल्य कार्यक्रमांनाही म्हणावा तसा प्रेक्षकवर्ग आहे असे वाटत नाही. कलाकारांच्या दृष्टीकोनातून किंवा त्यांच्या भविष्यासाठीही हे जरी हे ठीक नसले, तरी वास्तव नाकारताही येत नाही. रोज सकाळपासून अनेक गृप्सवर सतत अनेक कार्यक्रमांच्या असंख्...