कलाकाराची रोजनिशी ....
कलाकाराची रोजनिशी .... खूप दिवसांनी आपल्या आवडत्या कलाकाराचा कार्यक्रम जाहीर झालेला असतो. रसिकजन प्रवेशिकांसाठी रांगा लावतात. प्रत्यक्ष कार्यक्रमाचा दिवस उजाडतो. कार्यक्रमाचे ठिकाण गजबजून जाते. मंचावर प्रकाशाचा झगमगाट असतो. सुंदर सजावटीने रंगमंच सजवलेला असतो. ध्वनीव्यवस्था उत्तम लागलेली असते. खाण्यापिण्याचे स्टॉलही रसनेची तल्लफ़ पुरी करण्यासाठी सज्ज झालेले असतात. श्रोते कलाकाराची आतुरतेने वाट पहात असतात. कलाकार मंचावर येतात. कार्यक्रम मोठा बहारदार होतो. कलाकाराच्या आविष्काराच्या आठवणीत, धुंदीत सर्व श्रोते आंदाने घरी जातात. सर्व काही छान झालेले असते. श्रोते मंत्रमुग्ध वगैरे होतात, स्वर खूप दिवस कानात रेंगाळतात, आनंदसागरात न्हाउन निघतात, वगैरे वगैरे दुसर्या दिवशी वृत्तपत्रात छापून येते. मग दुसरा दिवस उजाडतो. सामान्य रसिकजनांना विशेष फ़रक जाणवत नाही, कारण कालच्या कलाकाराच्या आविष्काराने श्रवणशक्तीची तहान भागलेली असते. नुसत्या खुर्च्या उरलेल्या त्या भकास मांडवामध्ये संय...