Posts

Showing posts from March, 2023

राजहंसी पखवाजवादक : पं प्रकाश शेजवळ

Image
२ ऑक्टोबर २०२२ रोजी श्रेष्ठ पखवाजवादक पं अर्जुन शेजवळ यांचे सुपुत्र व आमचा बालमित्र पं प्रकाश शेजवळ याचे अकाली निधन झाले त्यानिमित्त काही आठवणी .... राजहंसी पखवाजवादक : पं प्रकाश शेजवळ..... आयुष्याची गाडी आता अशा वळणावर येऊन ठेपलीय कि,कोणती बातमी काय सांगावा घेऊन येईल सांगता येत नाही. कधी अनपेक्षित येणारी बातमी किंवा क्वचित येणारा सुहृदाचा फोन, बहुदा अशुभाचेच संकेत देतो. काल रात्री असाच भावनाचा फोन आला. संबंध तसे तिचे म्हटले तर काहीच नाहीत, म्हटले तर कधीच विसरता येणार नाहीत असे. फोनवर फारशा प्रास्ताविकाशिवाय, अरे प्रकाश गेला असे तिने सांगितले... मात्र पुढचे ना काही ऐकू आले, ना काही दिसेनासे झाले... भावना डुंबरे म्हणजे श्रेष्ठतम पखवाजवादक पंडित अर्जुन शेजवळ यांची कन्या. तिचा भाऊ म्हणजे, म्हणजे आमचा बालमित्र प्रकाश शेजवळ. तिच्या या फोनने, बातमीने, असंख्य आठवणींचे मोहोळच उठवले जणू. अत्यंत मनस्वी स्वभावाचा, स्वर्गीय आण्णांचा म्हणजे पंडित अर्जुन शेजवळांच्या विद्येचा वारसा निष्ठेने पुढे नेण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणारा प्रकाश, असा अचानक अवेळी, एकाएकी अंधाराच्या दिशेने प्रवास सुरु करेल हे सगळ...