वो कोई और ना था....
our friends सहज सुचलं म्हणून..... __________________________________________ वो कोई और ना था चंद खुष्क पत्ते थे शजरसे टूट के फस्ले गुलपे रोये थे ही कवि मंडळी दोन ओळीत जणू विश्व सामावतात असं म्हणतात ते अगदी खरं आहे. वो कोई और ना था अशा अहमद नदीम कासमी नावाच्या पाकिस्तानी शायरनी दोन ओळी लिहिल्या आहेत. गुलाम अली साहेबांनी त्या गाऊन, त्यामध्ये स्वरांचा नवा रंगही भरला. खरं तर इतक्या साध्या ओळी आणि शब्द आहेत. फार जड उर्दू पण नाहीये. वो कोई और ना था, असं नदीमसाहेब म्हणतात, म्हणजे तो किंवा ती दुसरं कोणीच नव्हतं, असा प्रथमदर्शनी साधा सरळ अर्थ वाटतो, तोही बरोबरच आहे. पण संपूर्ण शेर वाचता वाचता त्या गोष्टीतली गंमत एखादं मिळालेल्या प्रेझेंटचं रंगीबेरंगी वेष्टन उलगडताना कुुतुहल किंवा त्यातली गंमत वाढत जावी तसं होतं. कोणाची तरी चाहूल लागावी आणि माझ्या मनातला तो किंवा तीच ती, खरंच आली कि काय असं वाटावं पण... कोणीच आलं नव्हतं. चंद खुष्क पत्ते थे म्हणजे फक्त पाचोळ्याचा आवाज तेवढा झाला..! खरी या ओळीची खुमारी, गंमत इथेच आहे, कोणी आलं तर नाही, पण भास तर झाला ना... तो कोणाचा तरी होता !!! मग कोणी आलंच नाही ...