सवाई गंधर्व महोत्सवाचे वारकरी : सुधाकर धायगुडे
सवाईचे वारकरी
या गोष्टीलाही आता जवळजवळ १८ वर्ष झाली. माझा बालमित्र दीपक नानिवडेकर याच्या सदाशिव पेठेतल्या सासुरवाडी गेलो होतो. काय कारण होते आठवत नाही बहुदा सहजच गेलो होतो. त्याचे सासरे सुधाकर धायगुडे संगीतप्रेमी आहेत एवढेच माहीती होते. त्यांच्याशी बोलता बोलता मी सवाई गंधर्व महोत्सवाची एक वही केली आहे, असे ते सहजच बोलून गेले. उत्सुकतेने पाहू बरं ती वही असे म्हणून ती हातात घेतली आणि त्यातील नोंदी पाहून अवाक् झालो. लवकरच त्यांच्यावर दै सकाळ मध्ये या संदर्भात लिहिलं. ज्या दिवशी हा लेख प्रसिद्ध झाला त्यावेळी सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. त्यामुळे त्या दिवशी सवाईच्या मांडवात अनेक रसिकांकडून त्यांना भरपूर दाद मिळाली, त्याचं कौतुक झालं. एका सामान्य रसिकाने जवळ जवळ ४० वर्षाच्या नोंदी ठेवल्यामुळे एक उत्तम संदर्भग्रंथ तयार होऊ शकला. सवाईच्या मांडवात त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंद आणि समाधान केवळ अवर्णनीय होते. याच नोंदींवरून सवाई गंधर्व महोत्सवाच्या संदर्भात दोन उत्तम संदर्भ ग्रंथ तयार झाले त्याची ही हकीकत....
पुण्याची थंडी जशी अधिक बोचरी होऊ लागते, तसे पुण्यामध्ये संगीताचे वातावरण तापू लागते. संगीतप्रेमींना सवाई गंधर्व महोत्सवाचे वेध लागतात. महोत्सवाच्या तारखा, त्यात सहभागी होणारे कलाकार, यांच्याविषयीच्या चर्चा रंगू लागतात. पहिली जाहिरात पहिल्यापासून, थेट त्या वातावरणात दाखल होईपर्यंत, एक अनामिक ओढ, संगीत प्रेमींच्या उरात नक्कीच अस्वस्थ करत असते. फक्त पुणेकरच नाही, तर या गर्दीत परगावचे रसिकही खूप मोठ्या संख्येने आढळतात. परगावाहून आपली कामे बाजूला सारून, खास रजा टाकून, न चुकता दर वर्षी येणारे रसिकांचे अनेक गट आहेत. या महोत्सवाचे वातावरण, तेथील स्टॉल, याविषयी लिहू तेवढे थोडे आहे पण त्या मंचावरच्या कलाकारांविषयी काही माहिती सांगायची म्हटली, तर चटकन काही सांगता येणार नाही. तसेच या महोत्सवात प्रत्येक वर्षी कोणकोणते कलाकार येऊन गेले, त्यांनी कोणकोणते राग गायले, वाजवले, त्यांना साथीदार कोण होते, कोणकोणते नर्तक आत्तापर्यंत नाचले, कोण कोणते वाद्य वादक आले, या प्रश्नांची उत्तरे तुम्हा-आम्हाला ठाऊक नसली, तरी अशा सर्व प्रश्नांची हमखास व अचूक उत्तरे देऊ शकणारे एकमेव रसिक म्हणजे सुधाकरराव धायगुडे !!! सुधाकरराव म्हणजे सवाई गंधर्व महोत्सवाचा चालताबोलता इतिहास आहेत. त्यांचे वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचे म्हणजे १९६२ पासून अगदी आजपर्यंत, प्रत्येक वर्षाच्या सवाई गंधर्व महोत्सवाची संपूर्ण नोंद असलेली माहिती, त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवली आहे. म्हणजे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, पहिल्या कलाकाराने कोणता राग वाजवला, कोणते कलाकार कोणत्या क्रमाने मंचावर आले, त्यांचे साथीदार कोण होते, याशिवाय शक्य तिथे कार्यक्रमाचा थोडक्यात गोषवारा अशी सर्व माहिती त्यात आहे. सहज म्हणून त्यांनी माहिती लिहायला सुरुवात केली खरी, पण आज त्याचा उत्तम संदर्भग्रंथ तयार झाला आहे.
स्वतः सुधाकरराव हे गाणाऱ्या-वाजवणाऱ्यातले नाहीत, पण पक्के कानसेन. गाणाऱ्याचा राग कसा बिघडला याचे शास्त्र त्यांना सांगता येणार नाही, पण काहीतरी चुकीचे गातो आहे, हे मात्र पटकन सांगतील. तसा त्यांच्या वडिलांकडून त्यांना संगीताचा वारसा मिळाला, पण अगोदर नोकरी मग छंद, या त्यावेळच्या सूत्रानुसार संगीताचा शौक, केवळ शौकच राहिला. श्रवणभक्ती बरोबरच स्वत:च्या आवडीचे अभ्यासात रूपांतर करणारे, सुधाकररावांसारखे रसिक विरळा. त्यांचाही ऐकणाऱ्यांचा एक गट व त्यांची सवाईच्या मंडपातील जागा ठरलेली आहे. कलाकाराला कोणतीही फरमाईश व दाद याच गटाकडून सर्वप्रथम येते ! पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे व पंडित कुमार गंधर्व ही सुधाकररावांची दैवते. आजही भीमसेनजींविषयीचा आदर कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवते. त्यांचे या महोत्सवाचे वेड इतके कि रात्री ९ चा कार्यक्रम असला, तरी कार्यक्रम जवळून अनुभवता यावा, यासाठी सुधाकरराव पाच वाजताच मंडपात दाखल होतात !
त्यांच्या नोंदींमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण तपशील आढळतात. २८ डिसेंबर १९६२ मध्ये महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अल्लारखॉं यांचा मुलगा झाकीर हुसेन यांना, त्यांच्या वादनावर खुश होऊन कुमार गंधर्वांनी पंचवीस रुपये बक्षिस म्हणून दिले, तर १४ नोव्हेंबर १९६४ ला रात्री १:३५ ते ३:४५ पर्यंत बिरजू महाराज यांनी नृत्य सादर केले. त्यांना पंडित सामताप्रसाद यांची तबलासाथ व त्र्यंबक तारे यांची व्हायलीन साथ होती व विशेष म्हणजे एका रसिकाने (त्यांचेही नाव आहे) बिरजू महाराजांना आदरपूर्वक सोन्याची साखळी अर्पण केली, असाही उल्लेख आहे. प्रत्येक वर्षीच्या महोत्सवाची वैशिष्ट्ये पहायला व वाचायला आज खूपच गंमत वाटते १९६६ मध्ये शंभू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम चालू असताना, मंडपात कोणीतरी धूम्रपान केल्यामुळे, त्यांच्या भावदर्शनाचा 'घुंगट के पट खोल' हा कार्यक्रम अर्धवट थांबला, असे रसिकांच्या तर्हेवाईकपणाचे ही नमुनेही आढळतात. या प्रस्थापित कलाकारांविषयीच्या त्यांच्या सुरुवातीच्या काळातील नोंदी वाचताना जणू त्यांच्या कारकिर्दीचा आलेखच डोळ्यासमोर उभा राहतो. पं. अजय पोहनकर, श्रीमती मालिनी राजूरकर, पं. हरिप्रसाद चौरसिया, उ.अमजद अली खान यांचे अनेक उल्लेख या नोंदींमध्ये आहेत. १९७१ मध्ये उ. अमजद अली खान यांचे जोरदार सरोदवादन झाले, परंतु तेथे सकाळी शाळा भरल्यामुळे नाईलाजाने कार्यक्रम बंद करावा लागला व त्याची पुढे जरूर भरपाई करू असे खां साहेबांनी सांगितले. एका वर्षी विलायत खान, तबलासाथ निजामुद्दीन खा यांचा बहारदार रागेश्री ऐकून, संगीतकार मदन मोहन यांनी संस्थेस ५०१ रुपये दिले, असा उल्लेख आहे. महोत्सवाचे तीनही दिवसांचे तिकीट फाडून उरलेले तिकिटांचे नमुनेही जमवले आहेत. या महोत्सवाशी सुधाकरराव इतके एकरूप झाले आहेत, की अलीकडे काही वर्षे सवाईच्या मंचाच्या पाठीमागे फुलांची नक्षी केली जाते, ती नक्षी प्रत्येक वर्षी कोणती होती याचीही रेखाटने त्यांनी प्रत्येक वर्षाच्या नोंदी पुढे केली आहेत.
तसे पाहिले तर त्यांनी जमवलेली माहिती खूप दुर्मिळ व गोपनीय आहे, असे काही नाही. यातील अनेक घटनांचे, अनेक जण साक्षीदार असतील. अरे, मी हे ऐकले आहे, पाहिले आहे, असे सांगणारेही अनेक जण असतील. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या घटनेची नोंद ठेवणे !!! कारण कलेच्या बाबतीत अशा नोंदींना फारसे महत्त्व दिले जात नाही. एखाद्या कलाकाराला आतापर्यंत तुम्ही किती कार्यक्रम सादर केले असे विचारले, तर आठवूनही नक्की आकडा सांगता येणार नाही. एखादा अपवाद वगळता, बहुतेक कलाकारांच्या बाबतीत कार्यक्रमांच्या नोंदींविषयी अनास्थाच आढळते. याउलट खेळाडूंचे व त्यांच्या खेळांचे किती सामने व कुठे खेळले गेले, इतकेच नव्हे तर क्रिकेटपटू, टेनिसपटू यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये किती धन मिळाले, याचीही तपशिलवार नोंद ठेवली जाते. एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात किती चढ-उतार आले, तो आजारी पडला, परदेशी गेला किंवा नाही, याहीपेक्षा इतिहासाच्या दृष्टीने त्यांच्या सांगीतिक नोंदीच अभ्यासकांना उपयुक्त व मार्गदर्शकांचे ठरतात. त्यादृष्टीने सुधाकररावांच्या नोंदवहीचे मूल्य अपार आहे.
सुधाकररावांसाठी भीमसेनजी म्हणजे जणू विठ्ठल व त्यांच्या छायेत वावरत असलेला महोत्सव म्हणजे पंढरीच, यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. एकदा हा जमा केलेला खजिना, सुधाकररावांनी पंडित भीमसेनजींना दाखवला, तेव्हा पंडितजींनी त्यांचे कौतुक तर केलेच शिवाय या साऱ्याबद्दल तुमच्या काही अपेक्षा आहेत का, असे विचारताच सुधाकररावांनी, पंडितजी तुमच्यावर एखादा फोटो काढायची इच्छा आहे असे नम्र उत्तर दिले !!! वयाच्या ६७ व्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवाचे नाव काढताच आजही सुधाकररावांचा उत्साह, तरुणाला लाजवेल असाच आहे. या महोत्सवाच्या सुरेल वातावरणात रमणारा सच्चा कानसेन व पांडुरंगाच्या ओढीने पंढरीची वारी करणारा वारकरी यात मला तरी काही फरक वाटत नाही. दरवर्षी न चुकता स्वरांच्या या दिंडीमध्ये सामील होणाऱ्या सुधाकररावांना सवाईचा वारकरी म्हणायला हवे...
.....
त्यानंतर सुधाकररावांचे त्यांच्यासारखेच अवलिया मित्र भा ग शेरे, या दोघांनी मिळून, वरील नोंदींवरुन 'भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा' असे पुस्तक प्रकाशित केले. त्याचे प्रकाशन पंडित भीमसेनजींच्या हस्ते सवाईच्या मांडवातच झाले. हळूहळू वार्धक्याने सुधाकररावांचा उत्साह, हालचाली कमी होत गेल्या. तरीही सवाई गंधर्व महोत्सव सुरू झाल्यावर, त्यांना विस्मरणामुळे फारसे उमगत नव्हते, तरी एखाद्या दिवशी तरी हजेरी लावल्याशिवाय त्यांना आणि घरच्यांनाही चैन पडत नसे. सवाई पंढरीच्या या भाविकाचा २०१३ साली आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तेंव्हा सर्वांनाच खूप छान वाटले. पुलंच्या हरितात्यांप्रमाणेच पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, पंडित वसंतराव देशपांडे यांच्या गाण्याची आणि सवाई गंधर्व महोत्सवाची त्यांना धुंदी होती. बाकी पुलंच्या हरितात्यांप्रमाणे सुधाकररावांनी पुराव्याने शाबीत करीन असे काम मात्र करून ठेवले आहे.
हेमकांत नावडीकर

सवाईच्या ह्या वारकऱ्याला शतशः प्रणाम.हेमकांत,अगदी नेमक्या शब्दात वर्णन केलं आहेस आणि बाबांनी ज्या प्रेमाने हे सगळं केलं त्याचं तू त्याच ओलाव्याने वर्णन केलं आहेस.
ReplyDeleteमनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDelete