सवाई गंधर्व महोत्सवाचे वारकरी : सुधाकर धायगुडे
सवाईचे वारकरी या गोष्टीलाही आता जवळजवळ १८ वर्ष झाली. माझा बालमित्र दीपक नानिवडेकर याच्या सदाशिव पेठेतल्या सासुरवाडी गेलो होतो. काय कारण होते आठवत नाही बहुदा सहजच गेलो होतो. त्याचे सासरे सुधाकर धायगुडे संगीतप्रेमी आहेत एवढेच माहीती होते. त्यांच्याशी बोलता बोलता मी सवाई गंधर्व महोत्सवाची एक वही केली आहे, असे ते सहजच बोलून गेले. उत्सुकतेने पाहू बरं ती वही असे म्हणून ती हातात घेतली आणि त्यातील नोंदी पाहून अवाक् झालो. लवकरच त्यांच्यावर दै सकाळ मध्ये या संदर्भात लिहिलं. ज्या दिवशी हा लेख प्रसिद्ध झाला त्यावेळी सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. त्यामुळे त्या दिवशी सवाईच्या मांडवात अनेक रसिकांकडून त्यांना भरपूर दाद मिळाली, त्याचं कौतुक झालं. एका सामान्य रसिकाने जवळ जवळ ४० वर्षाच्या नोंदी ठेवल्यामुळे एक उत्तम संदर्भग्रंथ तयार होऊ शकला. सवाईच्या मांडवात त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंद आणि समाधान केवळ अवर्णनीय होते. याच नोंदींवरून सवाई गंधर्व महोत्सवाच्या संदर्भात दोन उत्तम संदर्भ ग्रंथ तयार झाले त्याची ही हकीकत.... पुण्याची थंडी जशी अधिक बोचरी होऊ लागते, तसे पुण्यामध्ये ...