आनंदयात्री हार्मोनियमवादक : पंडीत श्रीराम शहापूरकर

सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित श्रीराम शहापूरकर यांना २००५ साली गानवर्धन संस्थेतर्फे त्यांच्या हार्मोनियम वादनातील केलेल्या कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले होते, त्यानिमित्त दै लोकसत्ता मध्ये लिहिलेला लेख ब्लॉगच्या रूपात पुन्हा एकदा..
गानवर्धन या संस्थेतर्फे हार्मोनियम वादनासाठी कै.लीलाताई जळगावकर यांच्या नावाने दिला जाणारा व पं.आप्पासाहेब जळगावकर यांनी पुरस्कृत केलेला मानाचा पुरस्कार यावर्षी विख्यात हार्मोनियम वादक पंडित श्रीराम शहापूरकर यांना जाहीर झाला आहे. आजच्या पिढीला शहापूरकरजींचे नाव कदाचित माहिती नसेल, पण मागील पिढीतील कलाकार, रसिक, सर्वांनाच शहापूरकरांचे नाव माहिती नाही असे होणार नाही. गेली काही वर्षे अज्ञातवासात असलेले शहापूरकरजी आपली जणू दुसरी खेळी सुरू करत आहेत. मध्यंतरी पायाच्या दुखण्यातून सावरण्यास त्यांना काही अवधी लागला. त्याकाळात त्यांचं नाव थोडं विस्मृती मध्ये गेल्यासारखं झालं होतं. गोविंदराव टेंबे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, 'थोर कलावंतांची दुर्दैवाशी झुंज जगापुढे पाल्हाळाने मांडू नये, उगाच जगाची नालस्ती व्हायची'.. एका हार्मोनियम वादकाचे हे उद्गार पन्नास-साठ वर्षानंतर एका हार्मोनियम वादकाच्याच बाबतीत उद्धृत करायला लागावेत हा एक विचित्र योगायोगच.
प्रत्यक्ष भेटल्यानंतर शहापूरकरांशी बोलताना त्यांचे आजारपण, त्या आजाराचे कौतुक किंवा विस्मृतीत गेल्याबद्दलची यत्किंचितही कटुता त्यांच्या बोलण्यात नव्हती. कलेबद्दलची आत्मीयता, गाण्या-बजावण्यावरचे प्रेम, यामुळेच मी आज अगदी आनंदात आहे, असेच ते म्हणतात. केवळ संगीत सेवा करून स्वतःच्या मालकीचे घर उभारल्याचा त्यांना रास्त अभिमानही आहे. हुजूरपागा प्रशालेत इमाने-इतबारे नोकरी करून निष्कलंक निवृत्त झाले. तबलावादक असे पद शाळेत निर्माण केले व त्यामुळे त्यांच्यानंतर आणखी एक तबलावादक स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल याचाच त्यांना अधिक आनंद.
त्यांचा जन्म २४ एप्रिल १९४३ सालचा. त्यांचे वडील रेल्वे खात्यात होते. त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे, शहापूरकरांच्या शिक्षणाची थोडी आबाळच झाली. त्यात दृष्टी अधू असल्यामुळे ही शिक्षण जास्त घेता आले नाही. मुंबईत वडिलांची बदली झाल्यावर, १९५४ चाली कल्याण गायन समाजात व दिनकर संगीत विद्यालयात श्री बापूराव वाघ यांच्याकडे त्यांची रीतसर हार्मोनियमच्या शिक्षणास सुरुवात झाली. त्याचबरोबर गाण्याची व अल्लादियाखाँ अमरावतीवाले यांचे शिष्य, श्री अलोनी यांच्याकडे तबल्याची शिकवणी सुरू झाली. त्यांचे चुलते डॉक्टर एस वी भट हे शहापुरकरजींना पुण्यात घेऊन आले. त्यांच्याकडे राहून गांधर्व महाविद्यालयात पुढील शिक्षण सुरू झाले. वयानुसार आवाज फुटला व सहाजिकच त्यांचे तबल्याकडे जास्त लक्ष केंद्रित झाले. आकाशवाणीमधील दामूअण्णा मंगळवेढेकरांकडे यांच्याकडेही त्यांना तबला शिकायला मिळाला. सोनोपंत वाघमारे म्हणून त्याकाळी एक गायक वादक नट, असं बहुढंगी व्यक्तिमत्व होतं. त्यांचा शहापूरकरांवर भारी जीव. श्री वाघमारे शहापूरकरजींना श्रेष्ठ तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खाँ यांच्याकडे घेऊन गेले. १९५९ पासून खाँसाहेबांकडे रीतसर तबल्याचे शिक्षण सुरू झाले. १९६२ साली पंडित भीमसेनजींच्या हस्ते तबल्याच्या गंडाबंधनाचा कार्यक्रम झाला. नंतर काही काळ त्यांनी तबल्याच्या साथी केल्या. गंधे बुवा, डॉक्टर पानसरे, सुनंदा पटनायक इतकेच काय खुद्द वसंतराव देशपांडे व मिराशी बुवा यांनाही शहापुरकरजींनी तबल्याची साथ केली आहे. फक्त हार्मोनियमवादक म्हणून शहापूरकरजींना जे ओळखतात, त्यांना कदाचित आश्चर्य वाटेल. उत्तम हार्मोनियमवादकांची तशी त्या काळी वानवाच असल्यामुळे, कळत नकळत तबल्यापेक्षा हार्मोनियम हे वाद्य त्यांच्या अधिक जवळ येत गेले. मग हार्मोनियमवादकाचा एकदा शिक्का बसल्यावर, त्यातही शहापूरकरांनी मागे वळून पाहिले नाही. अनेक संगीतसभा तसेचआकाशवाणीवर भरपूर साथी केल्या. सवाई गंधर्व महोत्सवात पंडित मल्लिकार्जून मन्सूर, पंडित निवृत्ती बुवा सरनाईक पंडित फिरोज दस्तूर, पंडित भीमसेन जोशी, श्रीमती हिराबाई बडोदेकर, श्रीमती गंगूबाई हनगळ, श्रीमती किशोरी अमोणकर, श्रीमती प्रभा अत्रे, श्रीमती मालिनी राजूरकर अशा अनेक दिग्गजांना त्यांनी हार्मोनियमची साथ केली. पंडित आप्पासाहेब जळगावकरांच्या प्रेरणेने नृत्याची ही भरपूर साथसंगत केली. पंडित बिरजू महाराज, श्रीमती रोहिणी भाटे, श्रीमती प्रभा मराठे, श्रीमती शाश्वती सेन, श्रीमती मनीषा साठे अशा नृत्य क्षेत्रातीलही मान्यवर कलाकारांचे अनेक कार्यक्रम वाजवले. बऱ्याच हार्मोनियमवादकांना लेहरा वाजवणे हे कमीपणाचं वाटतं, पण शहापूरकरजी उत्तम लेहरा साथ करतात व त्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. कारण तबला कळणं, लय कळणं, लयकारी सांभाळणं, तबला ऐकता ऐकता हार्मोनियमवर आपलंही कसब दाखवणं, हे खूपच कठीण काम ज्यांनी खरोखरीची संगीत साधना केली आहे, त्यांनाच हे जमू शकतं. लेहरा संगतीच्या बाबतीतही शहापूरकरजी भाग्यवानच म्हटले पाहिजेत, कारण जुन्या व नव्या पिढीतील असामान्य तबलावादकांना साथ करण्याची संधी त्यांना लाभली. उस्ताद अहमदजान थिरकवा, पंडित सामताप्रसाद, उस्ताद शेख दाऊद खाँ, उस्ताद रमजान खाँ यांच्यापासून उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासारख्या महान तबलावादकांबरोबर लेहरा साथ करणे, हे तर आयुष्यातील जणू कसोटीचे, त्याचबरोबर अभिमानाचे ही क्षण. शाळेच्या परीक्षा जरी ते देऊ शकले नाहीत, तरी या कसोट्यांमध्ये त्यांना शंभर पैकी शंभरच गुण द्यावे लागतील. मैफलीमध्ये साथीदारांचा एक रिवाज आहे, वयाने, मानाने ज्येष्ठ असलेल्या मुख्य कलाकाराला, सांभाळून घ्या, अशी विनंती करतात. १९७२ साली भारत गायन समाजात उस्ताद अहमदजान थिरकवांबरोबर लेहऱ्यासाठी शहापूरकरजींनी हार्मोनियम हातात घेतली. शहापूरकरजी त्यावेळी ऐन तिशीत, तर खाँसाहेब नव्वदी ओलांडलेले ! रिवाजाप्रमाणे शहापूरकरजींनी खाँसाहेबांना 'सांभाळून घ्या' असे म्हणताच खाँसाहेब चटकन त्यांना म्हणाले, 'अरे, संभालने की उमर मेरी है या तेरी' !!!
शहापूरकरजींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष मैफलीमध्ये तर ते रंग जमवतातच, पण गप्पांच्या मैफलीतही पटकन रंग भरण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. याला कारण म्हणजे त्यांचा मनमोकळा स्वभाव, आनंद घेण्याची वृत्ती व सर्वांपाठीमागे जन्मभराच्या भटकंतीतून, प्रचंड बऱ्या-वाईट अनुभवांची भरलेली शिदोरी. त्यामुळे शहापुरकरजी आजही संगीताच्या सेवेत अजूनही मग्न आहेत, कोणी शिकायला आले तर शिकवतात नाहीतर आपल्या आवडत्या गीतांना गझलांना चाली लावून गुणगुणतात. उत्तम कलाकारांप्रमाणे उत्तम श्रोते निर्माण व्हावेत, ही इच्छा ते बाळगून आहेत. केवळ राग ओळखला, म्हणजे ऐकण्याची इतिश्री झाली, असे न समजता, गायक काय गातात, कसे मांडतात, याचा बारकाईने अभ्यास करणारे सुजाण श्रोते तयार व्हावेत असे त्यांना मनापासून वाटते. दिखाऊपणा आणि सवंगपणा याला महत्त्व न देता, साधनेच्या मार्गावर वाटचाल करणारे चिंतनशील कलाकार व्हावेत ही तळमळ त्यांना आहे.
त्यांचा मुलगा उदय आहे सध्या उत्तम हार्मोनियम वाजवतो आहे त्याचं त्यांना समाधान आहे. व्याधींकडे दुर्लक्ष करून जमेल तशी संगीत सेवा करत गीत गझलांना चाली लावत सोलो वादनाचे कार्यक्रम करीत हा आनंदयात्री चालतो आहे, या आनंदयात्रेला अनेक हार्दिक शुभेच्छा....
८ ऑक्टोबर २०१४ साली पंडीत श्रीराम शहापूरकरांना देवाज्ञा झाली...
हेमकांत नावडीकर

हेमकांत जी, किती यथार्थ चित्रण केले आहे तुम्ही! त्यांच्याबद्दलचे अनेक माहीत नसलेले तपशीलही ह्या लेखामुळे कळले - त्यासाठी तुम्हास धन्यवाद.
ReplyDeleteते गुणी कलाकार होतेच, पण साधासरळ, लाघवी माणूस म्हणूनही ते भावले.
शहापुरकरजींचा थोडाच सहवास मला लाभला तेव्हा त्यांच्या दिलखुलासपणाचा अनुभव मी घेतला होता - त्यांनी हार्मोनियमच्या फिंगरिंग मधील एक-दोन खास टिप्स मला दिल्या होत्या, तबला व कथक ह्या दोन्हीसाठी नगमा कसा वाजवावा याचेही सूत्र सांगितले होते.
शहापुरकरजींच्या स्मृतीस वंदन 🙏🏻
चैतन्यजी आपल्यासारख्या व्यासंगी कलाकारांकडून आलेल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार 🙏🏻
Deleteअप्रतिम लेख! खूप नेमकेपणाने लिहिले आहे.
ReplyDeleteमनापासून आभार 🙏🏻
Deleteकाकांचं अगदी योग्य शब्दात वर्णन केलं आहे
ReplyDeleteत्यांच्यावर ऐवधी संकट आली पण त्यांनी त्याच्याशी यशस्वीपणे लढा दिला.पायाच्या दुखण्यामुळे त्यांना नंतर घरात बसून राहावे लागत असे.पण कधीही त्यांना भेटायला गेलं की त्यांना देश विदेशात काय चाललं आहे हे माहीत असायचे, त्यांना भेटून आला की एक आनंद मनात भरून राहायचा आणि कुठल्याही समस्येला समोर जाता येईल असा विश्वास निर्माण व्हायचा...
दीपू खूप छान.सवाई मधे अनेक वेळा संवाधदिनीची साथ ऐकलेली.अतिशय लयबद्ध साथ करत.
Deleteएक वर्षी नृत्याची साथ ऐकलेली स्मरते.तुझ्या लेखामुळे पूर्व स्मृती जागृत झाल्या.
खूप धन्यवाद ..
Deleteवा खूप छान, मनापासून आभार 🙏🏻
ReplyDelete