Posts

Showing posts from 2020

सवाई गंधर्व महोत्सवाचे वारकरी : सुधाकर धायगुडे

Image
सवाईचे वारकरी या गोष्टीलाही आता जवळजवळ १८ वर्ष झाली. माझा बालमित्र दीपक नानिवडेकर याच्या सदाशिव पेठेतल्या सासुरवाडी गेलो होतो. काय कारण होते आठवत नाही बहुदा सहजच गेलो होतो. त्याचे सासरे सुधाकर धायगुडे संगीतप्रेमी आहेत एवढेच माहीती होते. त्यांच्याशी बोलता बोलता मी सवाई गंधर्व महोत्सवाची एक वही केली आहे, असे ते सहजच बोलून गेले. उत्सुकतेने पाहू बरं ती वही असे म्हणून ती हातात घेतली आणि त्यातील नोंदी पाहून अवाक् झालो. लवकरच त्यांच्यावर दै सकाळ मध्ये या संदर्भात लिहिलं. ज्या दिवशी हा लेख प्रसिद्ध झाला त्यावेळी सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. त्यामुळे त्या दिवशी सवाईच्या मांडवात अनेक रसिकांकडून त्यांना भरपूर दाद मिळाली, त्याचं कौतुक झालं. एका सामान्य रसिकाने जवळ जवळ ४० वर्षाच्या नोंदी ठेवल्यामुळे एक उत्तम संदर्भग्रंथ तयार होऊ शकला. सवाईच्या मांडवात   त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंद आणि समाधान केवळ अवर्णनीय होते. याच नोंदींवरून सवाई गंधर्व महोत्सवाच्या संदर्भात दोन उत्तम संदर्भ ग्रंथ तयार झाले त्याची ही हकीकत.... पुण्याची थंडी जशी अधिक बोचरी होऊ लागते, तसे पुण्यामध्ये ...

आनंदयात्री हार्मोनियमवादक : पंडीत श्रीराम शहापूरकर

Image
आनंदयात्री हार्मोनियमवादक : पंडीत श्रीराम शहापूरकर सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित श्रीराम शहापूरकर यांना २००५ साली गानवर्धन संस्थेतर्फे त्यांच्या हार्मोनियम वादनातील केलेल्या कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले होते, त्यानिमित्त दै लोकसत्ता मध्ये लिहिलेला लेख ब्लॉगच्या रूपात पुन्हा एकदा.. गानवर्धन या संस्थेतर्फे हार्मोनियम वादनासाठी कै.लीलाताई जळगावकर यांच्या नावाने दिला  जाणारा व पं.आप्पासाहेब जळगावकर यांनी पुरस्कृत केलेला मानाचा पुरस्कार यावर्षी विख्यात हार्मोनियम वादक पंडित श्रीराम शहापूरकर यांना जाहीर झाला आहे. आजच्या पिढीला शहापूरकरजींचे नाव कदाचित माहिती नसेल, पण  मागील पिढीतील कलाकार, रसिक, सर्वांनाच शहापूरकरांचे नाव माहिती नाही असे होणार नाही. गेली काही वर्षे अज्ञातवासात असलेले शहापूरकरजी आपली जणू दुसरी खेळी सुरू करत आहेत. मध्यंतरी पायाच्या दुखण्यातून सावरण्यास त्यांना काही अवधी लागला. त्याकाळात त्यांचं नाव थोडं विस्मृती मध्ये गेल्यासारखं झालं होतं.  गोविंदराव टेंबे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, 'थोर कलावंतांची दुर्दैवाशी झुंज जगापुढे पाल्हाळाने  मां...