साधनेत रमणारा तबलावादक : पं. आनिंदो चटर्जी
पंडित आनिंदो चटर्जी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २००३ साली सकाळ वृत्तपत्रासाठी घेतलेली मुलाखत.. आज ३० मे रोजी त्यांचा वाढदिवसानिमित्त पंडितजींचे हार्दिक अभिष्टचिंतन... साधनेत रमणारा तबलावादक : पं. आनिंदो चटर्जी प्रसिद्ध तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खान यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त विख्यात वादक पंडित आनिंदो चटर्जी यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम नुकताच पुण्यातील भरत नाट्य मंदीरात आयोजित करण्यात आला होता. पुण्यात बर्याच कालावधीनंतर व संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रथमच त्यांचा कार्यक्रम झाल्याने , रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. सुमारे दोन तास चाललेले अत्यंत दर्जेदार व प्रभावी वादन ऐकून ‘ श्रुती धन्य जाहल्या ’ अशीच सर्व श्रोत्यांची भावना होती. श्रेष्ठ गुरूंकडून प्राप्त केलेली दर्जेदार व घराणेदार विद्या , व ती विद्या खऱ्या अर्थाने हस्तगत करण्यासाठी घेतलेली मेहनत , यामुळे वादनात आलेली कमालीची सहजता , बोलांचा सु...