संगीतातील घराणी
संगीतातील घराणी संगीतात घराणी असावी कि असू नये याविषयावर नेहमीच उलटसुलट चर्चा चालू असते. बरेच वेळा मोठमोठे कलाकारही घराण्यांची बंधने हवीत कशाला असे म्हणताना दिसतात तेंव्हा सामान्यांना अधिकच गोंधळल्यासारखे होते. खरंच घराणी हवीत का नकोत? घराणं याचा शब्दश: अर्थ म्हणजे घर जरी असला तर घर असे सरळ का संबोधत नाहीत? कारण घर म्हणजे आपण राहतो ते चार भिंतींचे घर आणि घराणे म्हणजे नुसत्या चार भिंतीच नाहीत तर पूर्वजांच्या, वाडवडिलांच्या रुढी, परंपरा, चालिरीती, रितीरिवाज यांचे अनेक वर्षांचे संस्कार घेउन बनलेले घर म्हणजे घराणे. संगीतातील घराण्याच्या बाबतीतही असेच म्हणता येइल. संगीतातील घराणेसुद्धा आपल्या गुरुजनांच्या संस्कारांनी बनलेले असते. तो शिक्षण घेण्याचा एक राजमार्गच आहे म्हणा ना. आजही लग्नाच्या बाजारात चांगला मुलगा शोधायचा असेल तर त्याचं घराणं कोणतं किंवा कसे आहे हाच निकष मानला जातो. म्हणूनच चांगल्या घराण्यात संगीताचे शिक्षण घेतलेल्या कलाकाराचे गायन, वादन समजले नाही तरीही आनंद देणारेच असते. तो एक रुळलेला, खात्रीशीर, अनुभवसिद्ध यशाचा मार्ग असतो. या मार्गात धोक्याची ठिक...