अद्वितीय तबलावादक :- पं. लालजी गोखले
अद्वितीय तबलावादक पं. लालजी गोखले ********************************** सुप्रसिद्ध तबलावादक पं. लालजी गोखले यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या निमित्त दि. २७ जानेवारी ला शामराव कलमाडी प्रशाळेत विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांचे शिष्योत्तम श्री दत्ता भावे यांचे तबलावादन, श्रीमती सोनाली चक्रवर्ती यांचे कथक नृत्य व पं केदार बोडस यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते व पं लालजी गोखले यांचे पुतणे श्री विक्रम गोखले यांची विशेष उपस्तिथी या कार्यक्रमासाठी असणार आहे. मागील पिढीतील संगीत प्रेमींना पं लालजी यांची योग्यता व त्यांचे सांगीतिक योगदान या विषयी नव्याने सांगण्याची गरज नाही पण आत्ताच्या पिढीला त्यांची ओळख करून देणे व त्या निमित्ताने त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे असे वाटते. पं लालजींचा जन्म १६ जानेवारी १९१९ चा. त्याचे वडील रघुनाथराव व मातोश्री कमलाबाई दोघेही नाट्य-चित्रसृष्टीशी निगडीत. बाबुराव पेंटर निर्मित मुरलीवाला चित्रपटात त्यांनी कृष्णाची भूमिकाही केली. त्याकाळातील पहिले कृष्ण म्हणून त्यांचा राजकमल स्टुडीओत सत्कार करून व्ही शांताराम पुर...