पं. निखिल बॅनर्जी
पं. निखिल बॅनर्जी कलकत्त्याला सवाई गंधर्व महोत्सवासरखाच डोव्हर लेन नावाचा महोत्सव होतो. सुमारे १९८२-८३ साल असेल. त्या महोत्सवात जगद्विख्यात सतारिये पद्मभूषण पं. निखिल बॅनर्जी यांनी वाजवलेले एक ध्वनीमुद्रण कानावर आले. भैरव रागाची आलापी आणि अहिर भैरवमधील गत. संगतीला उस्ताद झाकीरभाई. ते एकदा ऐकले आणि नंतर कित्येक दिवस तेच अद्भुत ध्वनीमुद्रण ऐकतच राहिलो. अनेकदा ऐकूनही समाधान होईना. हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे २७ जानेवारीला पं. निखिलदांना जाऊन ३१ वर्ष झाली. निखिलदांच्या बाबतीत थोडसं नाही चिरा, नाही पणती असं झालं आहे असं वाटतं. कुणी नाव घ्यावं, त्यांचा संगीताचा वारसा चालवावा असे शिष्य नाहीत. कुटुंबात दोन मुलीच, त्याही स्वत:च्या वडिलांच्या दैवी संगीताविष्काराच्या वाटेपासून दूरच राहिल्या. हा मनस्वी, आत्ममग्न आणि द्रष्टा कलाकार तसा दुर्दैवीच म्हणायचा. एवढ्या मोठ्या कलाकाराचं असं का झालं माहिती नाही, पण असं काहीसं झालं आहे त्याचं वाईट वाटतं. तसं पाहिलं तर पं. रविशंकर, उ. विलायतखाँ या मागील पिढीतील हे दोन सतारिये म्हणजे जणू दोन ध्रुवच म्हणायला हवेत. एका...