आम्हा न कळे ज्ञान ...
आम्हा न कळे ज्ञान ... संगीत ऐकणाऱ्या श्रोत्यांचे, संगीत ऐकणाऱ्यांनीच संगीत कळणारे आणि न कळणारे असे दोन ठळक भेद करुन ठेवले आहेत. त्यातही संगीत कळणाऱ्यांमध्ये हौशी आणि जाणकार असेही भेद झालेले दिसतात. गंमत म्हणजे संगीत कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले महान गायक, वादक त्या उंचीला पोहोचल्यावर आता कोठे मला ‘सा’ समजतोय, किंवा तबलावादक ‘धा’ समजतोय असे म्हणतात आणि त्या शिखराच्या पायथ्याशी असलेल्या अनेकांना मात्र सगळं गाणं समजतं, ही काय भानगड आहे बुवा, हे काही कळत नाही. या शिवाय अनेक मोठ्मोठ्या संगीत मैफ़लीमध्ये पुढे बसलेले जाणकार आणि मागे बसलेले हौशी ऐकणारे, असे खरेच आहे काय हे ही बऱ्याच वेळा समजेनासे होते. म्हटलं तर, वर लिहिलेलं सगळंच खरं आहे किंवा यातलं काहीही खोटं नाही हे दोनही समज खरे आहेत ! म्हणजे संगीत कळणारेही श्रोते आहेत, न कळणारेही श्रोते आहेत, पुढे बसणाऱ्या श्रोत्यांना गाणं कळतं, मागे बसणारे श्रोतेही तितकेच समरसून ऐकतात. आणि साधनेच्या मार्गावरून, ज्ञाताचा प्रवास करता करता, ज्ञाताचे कुंपण ओलांडल्यावरही, गाणं समजायला कठीण असतं, असे म्हणणारे संगीतज्ञही खरंच ब...