Posts

Showing posts from 2025

आम्हा न कळे ज्ञान ...

  आम्हा न कळे ज्ञान ...  संगीत ऐकणाऱ्या श्रोत्यांचे, संगीत ऐकणाऱ्यांनीच संगीत कळणारे आणि न कळणारे असे दोन ठळक भेद करुन ठेवले आहेत. त्यातही संगीत कळणाऱ्यांमध्ये हौशी आणि जाणकार असेही भेद झालेले दिसतात. गंमत म्हणजे संगीत कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले महान गायक, वादक त्या उंचीला पोहोचल्यावर आता कोठे मला ‘सा’ समजतोय, किंवा तबलावादक ‘धा’ समजतोय असे म्हणतात आणि त्या शिखराच्या पायथ्याशी असलेल्या अनेकांना मात्र सगळं गाणं समजतं, ही काय भानगड आहे बुवा, हे काही कळत नाही. या शिवाय अनेक मोठ्मोठ्या संगीत मैफ़लीमध्ये पुढे बसलेले जाणकार आणि मागे बसलेले हौशी ऐकणारे, असे खरेच आहे काय हे ही बऱ्याच वेळा समजेनासे होते.  म्हटलं तर, वर लिहिलेलं सगळंच खरं आहे किंवा यातलं काहीही खोटं नाही हे दोनही समज खरे आहेत ! म्हणजे संगीत कळणारेही श्रोते आहेत, न कळणारेही श्रोते आहेत, पुढे बसणाऱ्या श्रोत्यांना गाणं कळतं, मागे बसणारे श्रोतेही तितकेच समरसून ऐकतात. आणि साधनेच्या मार्गावरून, ज्ञाताचा प्रवास करता करता, ज्ञाताचे कुंपण ओलांडल्यावरही, गाणं समजायला कठीण असतं, असे म्हणणारे संगीतज्ञही खरंच ब...

मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा

Image
  मार्दवपूर्ण गाण्यांचे माळपदक : माणिक वर्मा   स्व पद्मश्री माणिक वर्मा यांची गाणी मला फार आवडतात असं जर मी म्हणलं तर त्यात विशेष आणि वेगळं असं काय आहे. कारण माणिकताईंची गाणी मलाच काय सर्वांनाच तितकीच आवडतात. कोणत्याही प्रसंगी एखाद्या बेसावध क्षणी असो किंवा प्रवासात गाडीमध्ये आवर्जून लावलेली असो. माणिकताईंच्या आवाजातले गाणे सुरू झाले, त्यांचा आवाज ऐकला की आपोआप सर्व विसरून त्या गाण्यांमध्ये कधी मुग्ध होऊन जातो खरंच समजत नाही. आज माणिकताईंचा जन्मदिन. त्यांच्यावर आजवर पुलं पासून अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ दिग्गज मंडळींनी लिहिले आहे. पण जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या गाण्यातून मिळालेल्या आनंदातून थोडं उतराई व्हायचा प्रयत्न करून पहावा म्हणून हे शब्दांचे माळपदक.   सुगम संगीत गाणाऱ्यांचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज असावा लागतो असा एक सार्वत्रिक समज किंवा गैरसमज आहे असं अनेक वेळा जाणवतं. हे कदाचित थोडं विवादास्पद वाटेल पण माणिकताईंचा आवाज ऐकला की मात्र हे विधान खटकणार नाही. कारण माणिकताईंच्या आवाजात असलेले वेगळेपण. सुगम संगीतासाठी जसा आवाज लागतो तसा त्यांचा आवाज नक्कीच नव्हता....