Posts

Showing posts from December, 2024

या सम हा ..

Image
  या सम हा ..   त्या दिवशी संध्याकाळपासूनच बातम्या, विचारणा, कुजबूज आणि फोनाफोनी सुरू झाली. आणि जी बातमी कधीही यायला नको होती, ती बातमी दुर्दैवाने शेवटी आलीच. देह नश्वर वगैरे मनाला कितीही समजावले तरीही पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाच्या बातमीने मनाची अस्वस्थता कमी होईना. इतक्या वर्षांच्या सांगीतिक प्रवासाचे अदृष्य साथीदार, कधी श्रोता म्हणून, मग तबल्याचा विद्यार्थी म्हणून, कधी बंदिश चे संयोजकत्व म्हणून आणि आमच्या सांगीतिक जाणीवा, ज्ञान, समज   प्रगल्भ आणि समृद्ध करणारे, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वळणावर, किंवा सरळमार्गी आयुष्यातही सांगीतिक कक्षा रुंदावणारे झाकीरभाई नावाचे लोभस व्यक्तिमत्व त्यांच्या अकाली निधनाने चटका लावून गेले. संगीत हा शब्द समजणाऱ्या प्रत्येकाच्या मनाची तार छेडणारे, त्याला ताल लयीचे भान देणारे, शास्त्र समजले नाही तरी संगीताचा आनंद देणारे हे देखणे व्यक्तिमत्व, सर्वांच्याच गळ्यातले ताईत आणि लाडले होते. त्यांच्या निधनाने एकदम आमचा सगळा सांगीतिक प्रवासच समोर उभा राहिला. आता वयाची साठी ओलांडल्यावर लक्षात येते कि नकळत्या वयापासूनच झाकीरभाई आ...