आनंदयात्री हार्मोनियमवादक : पंडीत श्रीराम शहापूरकर
आनंदयात्री हार्मोनियमवादक : पंडीत श्रीराम शहापूरकर सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित श्रीराम शहापूरकर यांना २००५ साली गानवर्धन संस्थेतर्फे त्यांच्या हार्मोनियम वादनातील केलेल्या कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले होते, त्यानिमित्त दै लोकसत्ता मध्ये लिहिलेला लेख ब्लॉगच्या रूपात पुन्हा एकदा.. गानवर्धन या संस्थेतर्फे हार्मोनियम वादनासाठी कै.लीलाताई जळगावकर यांच्या नावाने दिला जाणारा व पं.आप्पासाहेब जळगावकर यांनी पुरस्कृत केलेला मानाचा पुरस्कार यावर्षी विख्यात हार्मोनियम वादक पंडित श्रीराम शहापूरकर यांना जाहीर झाला आहे. आजच्या पिढीला शहापूरकरजींचे नाव कदाचित माहिती नसेल, पण मागील पिढीतील कलाकार, रसिक, सर्वांनाच शहापूरकरांचे नाव माहिती नाही असे होणार नाही. गेली काही वर्षे अज्ञातवासात असलेले शहापूरकरजी आपली जणू दुसरी खेळी सुरू करत आहेत. मध्यंतरी पायाच्या दुखण्यातून सावरण्यास त्यांना काही अवधी लागला. त्याकाळात त्यांचं नाव थोडं विस्मृती मध्ये गेल्यासारखं झालं होतं. गोविंदराव टेंबे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, 'थोर कलावंतांची दुर्दैवाशी झुंज जगापुढे पाल्हाळाने मां...