Posts

Showing posts from February, 2019

जिंदादिल नंदूजी

Image
जिंदादिल नंदूजी ...       आहेत का मालक ? अशी मोठया आवाजात आपुलकीची हाक मारत त्यांची दुकानात एंट्री व्हायची. उंचीपुरी देहयष्टी. डोक्यावर हॅट, डोळ्यावर गॉगल आणि ऐटदार पोशाख, अशा मोठया रूबाबात ते दुकानात येत. दुकानाच्या मालकाशी इतक्या सलगीने सहसा कोणी अनोळखी गिऱ्हाईक येत नाही. माझ्याशीच काय पण कोणाशीही तितक्याच सहजपणे सलगी करायची त्यांची विलक्षण हातोटी होती. आनंद सिनेमातल्या आनंद प्रमाणे, आनंद वाटत जायचा त्यांचा स्वभाव होता. व्यसनच म्हणा ना. कोणाला भलभलते व्यसन असते, त्यांना माणसं जोडायचे व्यसन होते. संगीत वाद्यांच्या दुकानात वरचेवर यायला, संगीत ही काही रोजच्या गरजेची वस्तू नव्हे. तरीही हे गृहस्थ महिन्या दोन महिन्यातून, आहेत का मालक, अशी हाक मारत नक्की यायचेच. काय नवीन काय आलं आहे असं विचारत एखादी बासरी घेऊन जातील, तर कोणाला पेटीचं कव्हर पाहिजे, म्हणून कव्हर घेऊन जातील, किंवा कधी तर, 'आमच्या त्या यांना', अमुक अमुक वाद्य पाहिजे, एखादे छानसे वाद्य काढून ठेवा, मी पुढच्या वेळी आलो कि नक्की घेउन जाईन, असे म्हणून लापता व्हायचे, ते पुन्हा महिन्या-दोन-महिन्यात हजर!!!  प्र...