Posts

Showing posts from January, 2019

स्वरांच्या लोचनांनी विश्व पाहणारे संगीतकार - श्रीनिवास खळे

Image
स्वरांच्या लोचनांनी विश्व पाहणारे संगीतकार  - श्रीनिवास खळे      काही माणसांचे आणि आपले ऋणानुबंध का आणि कसे जुळावेत याला काही उत्तर नाही. एक तर ऋणानुबंध जुळायला खरंतर कुठेतरी काहीतरी समान धागा हवा. पण केंव्हा केंव्हा आयुष्यात नियती असे काही श्रीमंत दान पदरात टाकते कि आश्चर्यमुग्ध व्हायला होते. एके दिवशी माझ्या बाबतीतही असेच झाले. झोप उडवणारी अंगाई गीते देणारे संगीतकार, असं पुलंनी ज्यांचं वर्णन केले ते ज्येष्ठ, श्रेष्ठ संगीतकार पं श्रीनिवास खळे यांची अचानक भेट घडली आणि आयुष्य खरंच श्रीमंत होऊन गेले. त्यांच्याशी माझे ऋणानुबंध दैवानेच योजिले होते हेच खरे ! लता-आशा या संगीतातील सूर्य चंद्रांनाही त्यांच्या चाली गायच्या म्हणजे मोठं बिकट आव्हान वाटतं. मी तर खळे साहेबांच्या लेखी एक सर्वसाधारण कलाकार होतो. पण एके दिवशी, पुण्यातल्या सत्यशील देशपांड्यांच्या घरी अचानक खळेसाहेबांची भेट झाली. सत्यशीलजींनी हा मुलगा तबला वाजवतो असे सांगताच, उद्यापासून भीमसेनजींच्या घरी रिहर्सलस् चालू होताहेत, सकाळी दहा वाजता या त्यांच्या घरी. त्या दिवशी नियतीने एकदम दोन दोन दाने पदरात टाकून ...