Posts

Showing posts from March, 2017

उपजेचे बादशहा उ. झाकीर हुसेन

Image
उपजेचे बादशहा - उस्ताद झाकीर हुसेन   य़ेत्या ९ मार्च रोजी समस्त तबलावादकांचेच नव्हे तर जगभरातील सर्व संगीत रसिकांचे लाडके सरताज उस्ताद झाकीरभाईंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मागे वळून पाहता असं लक्षात आलं कि, तबला ऐकायला लागुन आता चाळीसहून अधिक वर्ष लोटली आहेत. यावर खरंतर विश्वास बसत नाही. ४० वर्षांनंतर आजही त्यांचे व्यक्तिमत्व आणि वादन पूर्वी सारखेच तरुण आहे. चिरतारुण्याचा वर घेउन आलेले त्यांचे कर, काळाने कोणत्या अवस्थेत बनवले आहेत याचे जणु संशोधनच व्हायला हवे ! १९७६ साली नूमविमध्ये बीजे मेडिकल आर्टस सर्कलचा कार्यक्रम होता. पं.हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी संगतीसाठी झकीरभाईंना प्रथमच ऐकत होतो. बहुतेक महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल अलीयावरजंग यांच्या मृत्युमुळे, पक्के आठवत नाही, कार्यक्रम होइल कि नाही याविषयी साशंकताच होती. प्रथम हरिजींनी मारवा व नंतर वाचस्पती वाजवला आणि त्यावेळी झाकीरभाइंनी तबल्यावर कमाल केली व रसिकांना जिंकले एवढेच ध्यानात आहे. त्यानंतर झाकीरभाई हजारो वेळा पुण्यात आले पण प्रत्येक वेळा ते आले, त्यांनी वाजवले आणि त्यांनी जिंकले. आज इतक्या वर्षांनंतर त्यां...